नवी मुंबई : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेविरुद्ध सर्वपक्षीय एकत्र आले आहेत. मुंढेंनी अनधिकृत बांधकामांवरील कारवाई रोखावी, यासाठी भाजप आमदार मंदा म्हात्रे आक्रमक झाल्या आहेत. त्यांच्यासह सर्वपक्षीयांनी येत्या सोमवारी बंदची हाक दिली आहे.

 

त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे विरुद्ध राजकारणी हा वाद नवी मुंबई शहरातही कायम राहणार आहे.

 

नवी मुंबईत गावठाणांशेजारी उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर पालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी हातोडा चालवला. त्यांच्या याच कारवाईला भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी विरोध केला आहे.

 

प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर कारवाई करु नये अशी मागणी म्हात्रे यांनी केली होती. पण मुंढे यांनी आपण गावाशेजारील घरांवर कारवाई करत असल्याचं स्पष्ट करुन कारवाई थांबवायला नकार दिला. त्यामुळे त्यांच्याविरोधात ही बंदची घोषणा करण्यात आली आहे.

 

...तर तुकाराम मुढेंविरोधात हक्कभंग आणू : मंदाताई म्हात्रे

 

नवी मुंबईतील गावठाणांमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली, तर येत्या पावसाळी अधिवेशनात तुकाराम मुंढेंविरोधात हक्कभंग दाखल करण्याचा इशारा, आमदार मंदा म्हात्रे यांनी दिला.

 

संबंधित बातम्या

...तर तुकाराम मुढेंविरोधात हक्कभंग आणू : मंदाताई म्हात्रे

तुकाराम मुंढेंनी नवी मुंबई आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला!

नवी मुंबईकरांच्या समस्या जाणण्यासाठी तुकाराम मुंढेंचा ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रम

नवी मुंबईतील 20 झुणका भाकर केंद्र सील, आयुक्त तुकाराम मुंढेंची कारवाई

तुकाराम मुंढेंचा नवी मुंबईत धडक कारवाई, 6 कामचुकार अधिकाऱ्यांचं निलंबन