नवी मुंबई : उच्च पदस्थ अधिकारी अमन मित्तल आणि त्यांचा भाव देवेश मित्तल यांच्या विरोधात रबाळे पोलीस (Rabale Police Station) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एअरटेल मधील दोन कामगारांना बेदम चोप दिल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अमन मित्तल यांनी सुध्दा एअरटेलचे (Airtel) कामगार सागर मांढरे आणि भूषण गुजर यांच्या विरोधात शिवीगाळ करणे , मारहाण करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अमन मित्तल हे घणसोली येथे राहण्यास असून त्यांच्या घरात इंटरनेटचे कनेक्शन लावण्यासाठी एअरटेलमधील कामगारांना बोलविण्यात आले होते.
उच्च पदस्थ अधिकारी अमन मित्तल आणि त्यांचा भाव देवेश मित्तल यांच्या विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एअरटेल मधील दोन कानगारांना बेदम चोप दिल्याबद्दलचा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अमन मित्तल यांनी सुध्दा एअरटेल चे कामगार सागर मांढरे आणि भूषण गुजर यांच्या विरोधात शिवीगाळ करणे , मारहाण करणे आदी कलमा कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अमन मित्तल हे घणसोली येथे राहण्यास असून त्यांच्या घरात इंटरनेटचे कनेक्शन लावण्यासाठी एअरटेलमधील कामगारांना बोलविण्यात आले होते. यावेळी घरात राऊटर लावूनही इंटरनेट चालू न झाल्याने अमन मित्तल आणि एअरटेल कामगारांमध्ये वाद झाले. यावाळी एअरटेलचे कामगार भूषण गुजर आणि सागर मांढरे यांना बेदम मारहाण केल्याचे फोटो समोर आले आहेत. लोखंडी रॅाड , पियूसी पाईपच्या साहाय्याने ही मारहाण करण्यात आली आहे. मित्तल यांनी चार जणांना बाहेरून बोलवून आपल्याला जबर मारहाण केल्याचा आरोप सागर मांढरे आणि भूषण गुजर यांनी केलाय. रबाळे पोलीस ठाण्यात अमन मित्तल , देवेश मित्तल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दुसरीकडे अमन मित्तल यांनी सुध्दा सागर आणि भुषण या दोघांवर मारहाणीचा आरोप केलाय. आपल्याला शिवराळ भाषा वापरून मशीनने तोंडावर मारले असल्याचा गुन्हा रबाळे पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.
हे ही वाचा :
Navi Mumbai News : नवी मुंबईत एक वर्षात 371 मुलं घर सोडून पळाली; पोलिसांकडून शाळांमध्ये करण्यात येणार समुपदेशन