मुंबई : महालक्ष्मी रेस कोर्स (Mahalaxmi Race Course) पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केलेल्या आरोपानंतर चर्चेत आला आहे. महालक्ष्मी रेस कोर्सची जागा राज्य सरकारच्या जवळच्या बिल्डरकडून बळकवण्याचा प्रयत्न होत असून, संबंधित बिल्डर हा त्या ठिकाणच्या व्यवस्थापनाला धमकवत असून करार करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. रेस कोर्सवर काही जागा रेसिंगसाठी ठेवून इतर जागेवर हॉटेल्स बिल्डिंग उभारण्याचा डाव असल्याचं ठाकरेंचं म्हणणं आहे. मात्र या ठिकाणी थीम पार्क उभारण्याचा राज्य सरकारने मुंबई महापालिकेचा (BMC) प्रयत्न आहे.
शिवसेना ठाकरे गटाने हा रेसकोर्स हलवला जात असेल आणि त्यासाठी जर खाजगी जागा संपादित केली जात असेल आणि त्यासाठी जर पैसे मोजले असतील तर त्याला विरोध दर्शवला आहे. रेसकोर्स हा सरकारी जागेवरच व्हावा, अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाने घेतली आहे.
महालक्ष्मी रेसकोर्सवर थीमपार्क साकारण्याचे प्रयत्न कुठपर्यंत आले ?
2013 साली महालक्ष्मी रेस कोर्सचा संबंधित करार हा संपुष्टात आला आणि त्यानंतर राज्य सरकारने रेस कोर्सची मालकी आपल्याकडे घेतली. मधल्या काळात मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये याच महालक्ष्मी रेस कोर्सच्या जागेवर थीम पार्क साकारण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मागील वर्षी मुंबई महापालिकेकडून थीम पार्क या रेस कोर्सवर तयार करण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यासाठी हालचाली देखील मुंबई महापालिकेने केल्या. जानेवारी 2023 मध्ये बीएमसीने राज्य सरकारला महालक्ष्मी 226 एकर ची जागा मुंबई महापालिकेला हस्तांतरित करावी अशा आशयाचे पत्र दिले. आतापर्यंत मुंबई महापालिकेची एकूण 226 एकर जागेपैकी 30 टक्के जागेवर मालकी आहे. उर्वरित 70 टक्के जागेवर राज्य सरकारची मालकी आहे त्यामुळे थीम पार्क साकारायचा असेल तर संपूर्ण रेस कोर्सच्या जागेवर मालकी मुंबई महापालिकेला हवी होती.
करार करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप
नगर विकास विभागाने रेस कोर्स हलवण्यासाठी पर्यायी जागांचा विचार सुरू केला. यामध्ये प्रामुख्याने मुलुंड ग्राउंडचा सुरुवातीला विचार करण्यात आला. मात्र या ठिकाणी खाजगी विकासाकडून जमीन रेस कोर्ससाठी विकत घ्यावी लागणार होती आणि ते व्यवहार्य नसल्याने सिडकोच्या जागेवर विशेष करून खारघर आणि उरणमध्ये रेस कोर्स हलवण्यावर विचार झाला. तरीसुद्धा अद्याप अधिकृतरित्या कुठल्याही प्रकारचा निर्णय रेस कोर्स संदर्भात घेण्यात आलेला नाही. आता आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारच्या जवळच्या बिल्डरकडून संबंधित रॉयल वेस्टर्न इंडिया टर क्लब या व्यवस्थापनाला धमकावले जात असल्याचा आणि करार करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप केला आहे.
हे ही वाचा :