मुंबई: एयर इंडियाच्या विमानात एअर होस्टेसचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी अहमदाबाद-मुंबई प्रवासादरम्यान ही घटना घडली असून, याप्रकरणात विमानात काम करणाऱ्या केबिन क्रू मेंबरला अटक करण्यात आली.


शुक्रवारी अहमदाबादहून मुंबईला येण्यासाठी एयर इंडियाच्या विमानानं उड्डाण केल्यानंतर, पायलटने एका 40 वर्षीय एयर होस्टेससोबत शाब्दिक वाद झाले.

मात्र यानंतर संपूर्ण प्रवासभर त्याने आपल्याला पाहून अश्लील शेरेबाजी केल्याचा आरोप संबंधित एयरहोस्टेसनं केला.

याप्रकरणी एअर होस्टेसच्या तक्रारीनुसार मुंबईतील सहार पोलीस ठाण्यात पायलटविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी पोलीस मात्र कुठल्याही प्रकारची माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत.