फाऊंडेशन आणि एलिमेंट्री प्रवेशाला सुरुवात व्हावी. तसंच 5400 रुपयांऐवजी दहा हजार रुपये फी घेतली, ती परत करावी आणि संस्थेचा कारभार नीट चालण्यासाठी प्रसाशकीय अधिकारी नेमावा, या मागण्यांसाठी एल. एस. रहेजा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं.
मागील काही महिन्यांपासून अनेकदा मागणी करुनही कारवाई होत नसल्याने या विद्यार्थ्यांनी थेट मंत्रालयावर ध़डक दिली आणि शिक्षणमंत्री विनोद तावडेंविरोधात घोषणाबाजीही केली.
आंदोलनादरम्यान सुमारे 100 विद्यार्थ्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर पोलिस उपायुक्त मनोज कुमार शर्मा यांनी मारहाण केल्याचा आरोप विद्यार्थ्यांना केला आहे.
पाहा व्हिडीओ