ARTHUR ROAD JAIL: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यासह अनिल देशमुख आणि नवाब मलिक या तीन व्हीव्हीआयपी कैद्यांना इतर काही व्हीव्हीआयपी आरोपींची साथ लवकरच आर्थर रोड तुरुंगात मिळणार आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याचे कारण म्हणजे आर्थर रोड तुरुंगात नवीन 9 व्हीव्हीआयपी बराक बनवण्यात आले आहेत. आत हे बराक कोणत्या व्हीआयपीसाठी असतील हे येणार काळच कळणार आहे. मात्र असं असलं तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच काही मोठी नावं असलेले व्यक्ती आर्थर रोड तुरुंगात येणार आहेत, त्यासाठीच ही तयारी असल्याच सांगितलं जात आहे.
हजारों कोटींचा घोटाळा करुन परदेशात फरार झालेले विजय मल्ल्या आणि निरव मोदी या 9 बराकचा भविष्यात वापर करु शकतात, कारण दोघांनाही भारतात आणून त्यांच्याविरुद्ध लवकरात लवकर खटला चालवण्याचा प्रयत्न भारत सरकार करत आहेत. नीरव मोदी आणि मल्ल्या या दोघांनाही भारताकडे प्रत्यार्पण केल्यास आर्थर रोड तुरुंगाच्या 12 क्रमांकाच्या बराकमध्ये ठेवण्याचा प्रस्ताव होता. या बराकची रेकी, त्याचा व्हिडीओ यूके न्यायालयात सादर ही करण्यात आला होता. पण आता तयार झालेल्या या नवीन बराकचे नवीन पाहूण हे दोघे असतील.
मल्ल्या आणि निरव निरव मोदी यांच्या व्यतिरिक्त इतर बराकमध्ये भविष्यात कोण येतील या बद्दल आता कुणीच काही सांगू शकत नाही. पण येणारी व्यक्ती व्हीआयपी असेल हे निश्चित आहे. राजकीय वर्तुळात या घडीला ईडीच्या रडारवर आता कोण येईल याची सतत चर्चा असते. म्हणून भविष्यात इथे येणारी व्यक्ती ही राजकीय असल्याचं ही बोललं जात आहे.
कसे आहेत हे नवीन 9 बराक?
- हे नवीन 9 बराक ग्राउंड प्लस वन या स्ट्रक्चरचे आहेत. या बराकमध्ये जवळपास 8 सेल आहेत.
- तेथे संलग्न स्नानगृहे आहेत आणि कैद्यांना मेलामाईन क्रॉकरीसह गादी, उशी आणि बेडशीट पुरवले जाते.
- या सोबत या बराकमध्ये पंखा व टीव्ही सेट ही असतो.
- हे बराक तुरुंगाच्या इतर भागांपेक्षा वेगळे आसतात, जिथे गर्दी नसते.
दरम्यान, तुरुंग प्रशासन या नवीन बराक बद्दल कोणती ही माहिती देण्यास तयार नाही. फक्त इतकेच सांगितले जात आहे की, तुरुंगात वाढती गर्दी आणि जागेची कमतरता पूर्ण करण्यासाठी हे बराक बनवले गेले आहेत. पण प्रश्न असा आहे की, सामान्य कैदींची गर्दी कमी करण्यासाठी व्हीआयपी सेल का? जर व्हीआयपी सेल बनवले गेले आहेत, म्हणजेच इथं येणारा आरोपी देखील व्हीआयपीच असेल. म्हणून या नवीन बराकमध्ये कोणाची रवानगी होते? हे येत्या काळात कळू शकणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Sameer Wankhede : समीर वानखेडेंना मोठा दिलासा, मलिक यांना झटका; वानखेडे अनुसूचित जातीतील असल्याचा निर्वाळा
Sanjay Raut : Exclusive : कैदी नंबर 8959! संजय राऊत जेलमध्ये दिवसभर करतात काय?