मुंबई: मुंबईतील (Mumbai)  कथित रस्ते घोटाळ्यात (BMC Road Contract Scam) एक कंत्राटदार निलंबित झाल्यावर दक्षिण मुंबईतल्या (South Mumbai)  रस्त्यांसाठी आता नवीन टेंडर निघाले आहेत. या टेंडरबाबत शिवसेनेतल्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackray)  यांनी महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. आताच्या टेंडरची रक्कम 300 कोटींनी कमी आहे, हा फरक कसा काय झाला असा सवाल आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल(Iqbal Singh Chahal)  यांना पत्र लिहून केला आहे. त्याचं कारण म्हणजे आधीचं टेंडर एक हजार 670 कोटींचं होतं. पण नवं टेंडर एक हजार 362 कोटींचं आहे. आधीच्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका  आणि त्याचं नाव सर्व मोठ्या वर्तमानपत्रात छापून आणा अशी मागणी देखील आदित्य ठाकरेंनी केली आहे. तर पावसाळ्यापूर्वी काम होणे कठीण असल्याने मेगा टेंडरऐवजी विभागनिहाय टेंडरमध्ये विभाजन करा,अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी पत्र लिहून आयुक्तांना  केली आहे. 


दक्षिण मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रीटकरणाचे कंत्राट संबंधित कंत्राटदाराने कुठल्याही प्रकारे काम न केल्याने मागील महिन्यात रद्द करण्यात आले होते. त्यानंतर आता या कामासंदर्भात निविदा काढण्यात आली आहे.  नवीन निविदेची किंमत 1362 कोटी एवढी आहे तर याआधी च्या निविदेची किंमत 1670 कोटी रुपये होती. त्यामुळे तीनशे कोटींचा फरक कसा निर्माण झाला ? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी पत्र लिहून मुंबई महापालिका आयुक्तांना विचारला आहे. त्याशिवाय आधीच्या कंत्राटदाराला ब्लॅक लिस्ट करण्यात यावे अशी विनंती सुद्धा पत्रात करण्यात आली आहे


टेंडरचे विभाजन प्रभागनिहाय करावे, भाजप नगरसेवकाची मागणी


या सगळ्या विविध प्रक्रियेमध्ये निविदा सादर करण्याची तारीख 27 डिसेंबर आहे तर पॅकेट ओपन करण्याची तारीख 28 डिसेंबर आहे.  त्यानंतर पंधरा-वीस दिवस बाकी प्रक्रियेला जाणार असून फेब्रुवारीमध्ये खऱ्या अर्थाने रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. दक्षिण मुंबईतील संपूर्ण सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम पावसाळ्याआधी म्हणजे फक्त फेब्रुवारीपासून मे अखेरपर्यंत होणे अशक्य आहे. त्यामुळे मेगा टेंडरचे विभाजन प्रभागनिहाय करावे, अशी मागणी माजी भाजपचे नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी पत्र लिहून केली आहे.


हे ही वाचा :