Aditya Thackeray, Mumbai : गेल्या दोन वर्षात राजकारणचा चोथा झालाय. गेल्या पाऊणे दोन वर्षात एकतरी बातमी वाचली का , की राज्यात नवा उद्योग आला, गुंतवणूक आली. फक्त जाहिरातींवर खर्च होतोय. मात्र, नवा उद्योग महाराष्ट्रात आलेलाच नाही. काल पर्वा रडारड केली. किती रडले तरी जनता तुम्हाला माफ करणार नाही. निर्लज्य आणि नीच लोक लोकांना आवडत नाहीत, अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी नाव न घेता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर केली. मुबईतील लालबाग येथे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा मेळावा पार पडला. यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते. 


शेतकऱ्यांना अडवण्यासाठी सैन्यबळ लावण्यात आलं, हे रावण राज्य आहे असं वाटू लागलय


आदित्य ठाकरे म्हणाले, केंद्र सरकार लाठीचार्ज करतय. शेतकऱ्यांना अडवण्यासाठी सैन्यबळ लावण्यात आलं आहे. रस्ते खोदून ठेवण्यात आले आहे. पाच ते सहा भारतरत्न दिले. शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या स्वामीनाथन यांना भारतरत्न दिला. मात्र, त्यांनी ज्या शेतकऱ्यांसाठी काम केलं. त्यांना अडवलं जातय. दक्षिणेतील राज्य सांगत आहेत. जीएसटीचा पैसा द्या. त्यांना हक्काचा पैसा दिला जात नाही. हे रावण राज्य आहे, असे वाटू लागले आहे. 



तरुणांना नोकऱ्या नाहीत 


शिदें सरकार चोरांचे आणि खोके सरकार आहे. त्यांची भूमिका दिल्ली दिसली लोटांगण घ्यायच अशी आहे. दोन तरुण मुलांनी संसदेत उडी मारली. त्यांना माहिती होती की असं केलं तर फाशी दिली जाईल. मात्र, तरिही त्यांनी उडी मारली. त्यांच्या मनस्थितीचा विचार करा. आम्हाला नोकऱ्या नाहीत. आमचा आवाज संसदेत पोहोचवायचा आहे, अशी त्यांची भावना आहे. मात्र, आज ते तरुण कोठे आहेत कोणालाच माहिती नाही. अशीच परिस्थिती देशातील तरुणांची आहे. त्यांना नोकऱ्याच नाहीत, असे आदित्य ठाकरेंनी नमूद केले. 


कोविड काळात आपलं काम सच्चं होतं


कोविड काळात मुंबईतसाठी उद्धव साहेबांच्या नेतृत्वात काम केलं. त्याचे जगभरात कौतुक झालं. आपलं काम सच्च काम होतं. आपण आकडे लपवले नाहीत. उत्तरप्रदेश, गुजरातप्रमाणे आपण आकडेवारी लपवली नाही. आज माझा प्रयत्न हाच आहे की, सत्य परिस्थिती तरुण आणि तरुणींना सांगायला पाहिजे, असेही ठाकरेंनी यावेळी बोलताना सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


CM Eknath Shinde : मातोश्रीवरून बाळासाहेबांची डरकाळी येत होती, तिथून आता रोज रडगाणं सुरुय; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला