मुंबई :  नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार झाल्याचं उघडकीस आलं आहे. नांदेड जिल्हयातील हदगाव तालुक्यातील मनाठा येथील सीएससी केंद्रचालकाने घोटाळा केल्याचं उघडं झालं.  सचिन मल्टीसर्विसेस नावाने गावातील सचिन थोरात हा युवक सुविधा केंद्र चालवतो.  रोजगार हमी योजनेसाठी कागदपत्रं आवश्यक आहेत म्हणून त्याने ओळखीच्या पुरुषांचे आधार कार्ड बँक पासबुक जमा केले. मात्र अर्ज भरताना  लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले. महिलांच्या आधार कार्डावर खाडाखोड करुन त्याने त्यावर पुरुषांचे आधार क्रमांक आणि बँक अकाऊंट नंबर टाकले आणि अर्ज भरले. अर्ज मंजूर झाल्यानंतर संबंधित पुरुषांकडून त्यानं पैसे उकळले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित केंद्रचालक सचिन थोरात फरार झाला आहे. तर, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकाराची चौकशी होईपर्यंत संबंधित बँक अकाऊंट सील करणार असल्याचं म्हटलं.


अदिती तटकरे काय म्हणाल्या?


महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या प्रकरणासंदर्भात बोलताना माझे जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून झालं आहे. जी
 30-35 अकाऊंट्स आहेत त्यांच्या बँकांशी संपर्क साधून हे अकाऊंट फ्रीज करण्याचे आदेश दिल्याचं त्यांनी म्हटलं. या अकाऊंट्समधे भविष्यात कुठल्याही प्रकारचे ट्रॅन्झॅक्शन होऊ नये याची दक्षता घेण्यात येईल. संबंधित आरोपी व्यक्तीचाही शोध सुरू आहे, असं अदिती तटकरे म्हणाल्या. 


अदिती तटकरे पुढं म्हणाल्या, जर चौकशीत जे नागरिक आहेत त्यांची अकाऊंट सील करण्यात आली होती ती पुन्हा चालू करु शकतो.जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी करण्यात येईल. या चौकशीत जे या प्रकरणी दोषी नसतील त्यांची खाती पुन्हा चालू केली जातील. मात्र, जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत त्यांची खाती सील ठेवणं आवश्यक आहे, असं अदिती तटकरे म्हणाल्या. जे निर्दोष असतील त्यांचे अकाऊंट लगेचच सुरु केली जाऊ शकतात.  


 जिल्हाधिकाऱ्यांचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश


लाडकी बहीण योजने संदर्भात झालेल्या  फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. नांदेड जिल्हयातील हदगाव तालुक्यातील मनाठा येथे सीएससी केंद्र चालकांने महिलांची माहिती भरुन, पुरुषांचे आधार क्रमांक नोंदवून त्याजागी पुरूषांचे आधार क्रमांक आणि बँक अकाऊंट नंबर टाकले. तब्बल 33 अर्ज सीएससी चालकाने अशा पद्धतीने भरले होते. लाडकी बहीण योजनेचे पैसै त्या - त्या पुरूषांच्या खात्यात जमा झाले. ते पैसै रोजगार हमी योजनेचे असल्याचे सांगून संबंधितांना केंद्र चालक सचिन थोरात याने आपल्या खात्यात पैसे वर्ग करायला लावले . हा प्रकार उघड झाल्यानंतर सचिन थोरात पसार झाला . दरम्यान या प्रकरणाची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली असुन या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.


इतर बातम्या :


आधारावर खाडखोड, लोकांचे अंगठे घेऊन पैसे लाटले, आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडून तपास करण्याचा आदेश!


Atal Pension Yojana : केंद्र सरकारच्या योजनेत 210 ते 1454 रुपयांची गंतवणूक करा अन् 5 हजार रुपये पेन्शन मिळवा, जाणून घ्या