Adani Mumbai International Airport: अदानी समूहाने आता जीव्हीके ग्रुपकडून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कमान हाती घेतली आहे. मंगळवारी अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी ही घोषणा केली. अदानी समूहाने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मुंबई विमानतळावरील जीव्हीके समूहाचा हिस्सा संपादन करण्याची घोषणा केली होती.


या करारानंतर अदानी ग्रुपचा मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळात 74 टक्के हिस्सा असेल. त्यापैकी 50.5 टक्के भागभांडवल जीव्हीके समूहाकडून आणि उर्वरित 23.5 टक्के भागभांडवल भागीदार विमानतळ कंपनी दक्षिण आफ्रिका (एसीएसए) आणि बिडवेस्ट समूहाकडून अधिग्रहित केला जाईल.


एमआयएएल बोर्डाच्या बैठकीनंतर अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडने (एएएचएल) जीव्हीके ग्रुपकडून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कमान हाती घेतली. गौतम अदानी म्हणाले, की "जागतिक दर्जाचे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापित करण्यास आम्हाला आनंद होत आहे. मुंबईला आमच्यावर अभिमान असेल. भविष्यातील व्यवसायासाठी अदानी समूह विमानतळात आणखी सुधारणा करेल. "


कंपनीने सांगितले, की “सन 2024 पर्यंत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचे विमान वाहतूक बाजार बनले असून, अदानी समूहाच्या अस्तित्त्वात असलेल्या सहा पोर्टफोलिओ व्यतिरिक्त मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि त्यानंतर तयार होणारे ग्रीनफिल्ड नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (एनएमआयएएल) हे परिवर्तनकारी प्लॅटफॉर्म देणार आहे. एक परिवर्तनीय विमान उड्डाण मंच प्रदान करते. यामुळे अदानी ग्रुपला त्याचे बी 2 बी आणि बी 2 सी व्यवसाय एकत्रित करण्यास तसेच गटातील अन्य बी 2 बी व्यवसायांमध्ये अनेक रणनीतिक जवळीक तयार करण्यास अनुमती मिळते." यामुळे अदानी ग्रुपला त्यांचे बी 2 बी आणि बी 2 सी व्यवसाय एकत्रित करण्यासोबच इतर बी 2 बी व्यवसायांमध्ये अनेक रणनीतिक जवळीक तयार करण्याची संधी देत आहे."


अदानी म्हणाले, “आमचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे विमानतळांना अधिक विकसित करुन पुनर्जीवित करणे आहे, जे स्थानिक आर्थिक वाढीस कारणीभूत ठरेल आणि केंद्राच्या रूपात काम करेल. याच्या माध्यमातून आपण विमानचालन-संबंधित व्यवसायांना प्रोत्साहित करू शकू. यात मनोरंजन सुविधा, ई-कॉमर्स आणि लॉजिस्टिक्स क्षमता, विमान सेवांवर अवलंबून असलेले उद्योग, स्मार्ट सिटींचा विरास यांचा समावेश आहे.


अदानी समूहाच्या लखनऊ, जयपूर, गुवाहाटी, अहमदाबाद, तिरुवनंतपुरम आणि मंगलुरू विमानतळांना सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलद्वारे चालण्याची परवानगी देण्यात आली आहे. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड ही भारताची सर्वात मोठी विमानतळ पायाभूत सुविधा कंपनी आहे, जी विमानतळांवर येणारे 25 टक्के आणि भारताच्या विमान वाहतुकीच्या 33 टक्के नियंत्रणाखाली आहे.