मुंबई : पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा खोटा आरोप करणाऱ्या पतीवर कारवाई करा, असा आदेश मुंबई हायकोर्टाने दिला आहे. पोलिस तपासात हा आरोप खोटा असल्याचं सिद्ध झाल्यावरही जामीन अर्जात पतीने तसा दावा केल्याचं उघड झालं.


विवाहितेचे वडील फरीद अहमद कुरेशी कोर्टात अर्ज दाखल केला होता. आपल्या मुलीचा हुंड्यासाठी छळ होत असल्याचा आरोप त्यांनी जावयावर केला होता. या अर्जावर जस्टिस ए. एस. गडकरी सुनावणी करणार आहेत. 'लाईव्ह लॉ' या वेबसाईटने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

सेशन्स कोर्टात सादर केलेल्या जामीन अर्जात आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा दावा आरोपीने केला. आरोपीचा दावा खोटा असल्याचं तपास अधिकाऱ्यांच्या चौकशीत समोर आलं. तरीही आरोपीने मुंबई हायकोर्टातील जामीन अर्जात खोटे आरोप करणं सुरुच ठेवलं.

'आपल्या बाजूने परिस्थिती वळवून घेण्यासाठी खोटे आरोप करण्याची मानसिकता आरोपींमध्ये दिसून येते' असं मत विवाहितेचे वकील अॅड. निलेश ओझा यांनी मांडलं.

विवाहबाह्य संबंध असल्याचा खोटा आरोप करणाऱ्या पतीवर कारवाई करा, असा आदेश मुंबई हायकोर्टाने दिला.