मुंबई : तौक्ते चक्रीवादळामध्ये बुडालेल्या टग वरप्रदासंदर्भातआता मुंबईच्या येलो गेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरप्रदा टगची कंपनी ग्लोरी शिपमॅनेजमेंट प्रा लि आणी कंपनी मालक राजेंद्र साही यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी आधी बार्स पी थ्री झिरो फाय याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणी बार्शी कॅप्टन राकेश बलवंतवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र त्यांचा मृतदेह सापडल्यामुळे याप्रकरणी पुढे पोलिसांना काही करता आलं नाही. पण आता वर पडदा प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणी पोलिसांकडून अजून मोठ्या हालचाली होण्याच्या शक्यता आहे.
वादळामुळे बुडालेल्या वरप्रदा टगवरील वाचलेले फिर्यादी सेकंड इंजिनिअर नामे फ्रान्सिस के सायमन ह्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरप्रदा टगची कंपनी ग्लोरी शिपमॅनेजमेंट प्रा लि आणी कंपनी मालक राजेंद्र साही यांनी जाणीवपूर्वक टगची कोणतीही दुरुस्ती किंवा देखभाल केली नाही. त्यामुळे चक्रीवादळात टग पाण्यात बुडून त्यावरील अकरा क्रू मेंबरचे मृत्यूस कारणीभूत ठरले म्हणून त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
टग वरप्रदाची नीट काळजी घेतली असती आणि वेळ असता दुरुस्ती केली असते तर ही घटना टाळता आली असती. मात्र कंपनी आणि कंपनीच्या मालकांकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आलं यामुळे त्यांच्यावर मुंबईच्या येलोगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही मात्र लवकरच पोलिसांकडून कंपनीचे मालक यांना अटक करण्याची शक्यता आहे. तसेच कंपनीच्या इतर काही कर्मचाऱ्यांवर याप्रकरणी गुन्हा दाखल होऊ शकतो मात्र या प्रकरणात अजूनही पोलिसांचा तपास सुरू आहे. वरप्रदा टगची कंपनी ग्लोरी शिपमॅनेजमेंट प्रा लि आणी कंपनी मालक राजेंद्र साही यांच्या वर कलम 304(2),34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.