Mumbai building collapsed : मुंबईतील (Mumbai) मालाड परिसरात काल 19 मे रोजी बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एका 30 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असल्याचे समजते.


एका व्यक्तीचा जागीच मृत्यू, बांधकाम व्यावसायिक फरार


मालाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालाड परिसरात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीचा काही भाग कोसळला, यामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, ही घटना घडल्यानंतर मालाड पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहचले असता तेथील बांधकाम व्यावसायिक फरार झाल्याची माहिती मिळत आहे. तर काही कामगारांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून याचा पुढील तपास सुरू असल्याचं मालाड पोलिसांकडून माहिती मिळत आहे. 


 






रुग्णालयात पोहचल्यानंतर व्यक्तीला मृत घोषित करण्यात आले.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मालाड (पश्चिम) येथील झकेरिया रोड येथे दुपारी ही घटना घडली, जेव्हा राज कुमार सोनी हा व्यक्ती लघुशंकेसाठी कन्स्ट्रक्शनच्या बाहेर पडला, त्यावेळी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब त्याच्यावर पडला, या वेळी या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे पोहोचल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आले. माहितीनुसार, मृत व्यक्ती इमारतीत असलेल्या ज्वेलरी स्टोअरमध्ये कामाला होता. दरम्यान, इमारतीचा बिल्डर आणि कंत्राटदाराविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) संबंधित कलमांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे, पुढील तपास सुरू आहे, असे मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक धनंजय लिगाडे यांनी सांगितले.


महत्वाच्या बातम्या:


नाथाभाऊंची 'खजूराची शेती'; कमी भांडवलातून लाखोंचं उत्पन्न मिळवण्याचा अनोखा प्रयोग


Devendra Fadnavis : सदाभाऊ खोतांच्या 'जागर शेतकऱ्याचा, आक्रोश महाराष्ट्राचा' या अभियानाचा आज समारोप, देवेंद्र फडणवीसांची टेंभुर्णीत सभा


Power Crisis : 6 राज्यांवर 75000 कोटींची थकबाकी; दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र, केंद्र सरकारने राज्यांना दिला इशारा


Pre Monsoon Rain : राज्यातील 'या' भागात  मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी, शेतकऱ्यांच्या फळपिकांना मात्र फटका