भिवंडी : गेल्या काही दिवसांत भिवंडीतील गोदाम पट्ट्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यातच नारपोली पोलिसांनी घरफोडीतील 5 गुन्हे उघडकीस आणून आतापर्यत 8 सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या चोरट्यांकडून कॉपर, झिंक, कापड, रोल व आयकॉन बॅग, फेब्रिक कापड प्रिंटर, डीव्हीआर, वाहनांसह तब्बल 64 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे तर चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला आहे.
पहिल्या गुन्ह्यातील त्रिकूटाकडून 14 लाख 23 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आजाद कुमार धरमचंद देरासरीया यांनी नारपोली पोलीस ठाण्यात तकार दिली की, 26 ऑगस्ट 2021 रोजी रात्रीच्या सुमारास त्यांच्या पूर्णा गावात असलेल्या जय भारत इम्पेक्स या कंपनीचे गोडाऊन फोडून चोरट्यांनी गोडावूनमध्ये ठेवलेला कॉपर व झिंक धातुचा माल, प्रिटर व डीव्हीआर मशीन लंपास केल्याची तक्रार दिली. या गुन्ह्याचा पोलिसांनी तपास करून आरोपी दिवाकर ब्रिजकिशोर जैयस्वाल, इम्रान रहेमान शेख, मोहम्मद सोऐब अब्दुल कुद्स मेमन उर्फ सोनु या त्रिकुटाला अटक केली. अटक आरोपींकडून गुन्हयातील चोरी केलेले कॉपर व झिंक ( जस्त ) धातु असे एकूण 10 लाख 23 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल व चोरी केलेला माल वाहून नेण्याकरिता वापरलेली दोन वाहने अशी एकूण 14 लाख 73 हजार रूपये किंमतीची मालमत्ता हस्तगत केली आहे.
दोन गुन्ह्यातील एकाच आरोपीकडून 16 लाख 89 हजारांचे टी शर्ट जप्त करण्यता आले आहे. आश्विनीकुमार यादगिरी पोटाबली यांचे मालकीचे काल्हेर गावात प्लॉस्ट अॅण्ड पोलीप्लेक्स प्रोडक्टस् कंपनीचे गोडावून आहे. हे गोडाऊन 20 ऑगस्ट रोजी फोडून त्यामधील आरोपी मजिबुर रेहमान अब्दुल रेहमान इद्रीसी याला अटक करून त्याच्याकडील पी.व्ही सी रोल व आयकॉन बँग ( पॅकींग मटेरीयल ) असा ORIGINAL JACE AND DECLIAN या कंपनीचे रूपये 16 लाख 18 हजार 650 रुपयांचे एकूण 1 हजार 350 टी शर्ट हस्तगत करण्यात आले आहेत.
चौथ्या गुन्ह्यात 16 लाख 11 हजारांचा मुद्देमालसह दोन आरोपींना अटक सुशील भगचंद्र जैन यांचे कोपर गावात होजेअरी फॅब्रिक कपड्याचे गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये ठेवलेला एकुण 18 लाख 86 हजार रुपयाचा होजेअरी फॅब्रिक कपड्याचा माल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार नारपोली पोलीस ठाण्यात दिली. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान तांत्रिक व गुप्त माहितीदारा मार्फत आरोपी मुमताज अहमद इनायत अली शाह, अख्तर अब्दुल जब्बार खान, यांना अटक केली आहे. आरोपीकडून 14 लाख 11 हजार -किमतीचे कपड्याचे रोल आणि गुन्ह्यात वापरलेले दोन वाहने असे एकूण 16 लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.
पाचव्या गुन्ह्यातील 13 लाख 91 हजारांचे कॉपर धातू जप्त करण्यात आले आहे. किष्णाकुमार रामप्रसाद यादव यांनी नारपोली पोलीस ठाण्यात तकार दिली की, 24 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2021 रोजीच्या दरम्यान दापोडे गावातील सी.एम.सी मेटल प्रा. लि. या कंपनीच्या गोडाऊनमधून लोखंडी पत्र्याचे 17 लाख 50 हजार रुपयांचे रोलिंग शटर अज्ञात चोरट्याने लंपास केले. या चोरीचा तपास करून गुन्ह्यामधील आरोपी अमरीश शिवाजी जाधव, शिला नरेंद्र मिश्रा या दोघांना अटक करून त्यांच्याकडून आतापर्यत 13 लाख 51 हजार रुपयांचे कॉपर हस्तगत केले आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण 15 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अशा एकूण पाच गुन्ह्यांमध्ये एकूण 63 लाख 93 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तर वरीष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे ) रविंद्र वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली नारपोली पोलीस ठाणे तपास पथकाचे अधिकारी स.पो नि. चेतन पाटील, पोलीस उपनिरीक्षक रोहन शेलार यांच्या पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी चोरीचे गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती डीसीपी योगेश चव्हाण यांनी दिली आहे.