उल्हासनगर : मापात पाप करणाऱ्या एका पेट्रोल पंपावरील कामगाराला नागरिकांनी चांगलाच चोप दिल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. ही घटना उल्हासनगरमधील असून चोप दिलेल्या कामगाराचं नाव शेरु सिंग असं आहे.
उल्हासनगरच्या श्रीराम चौक परिसरात भारत पेट्रोल पंपावर सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास एक चालक पेट्रोल भरण्यासाठी आला होता. यावेळी त्याने पण आपल्याला पेट्रोल कमी मिळाल्याचा आरोप केला. तसेच पेट्रोल भरताना कामगार शेरु सिंगच्या हालचालीही संशयास्पद असल्याचा आरोप करीत त्याने ७ ते ८ नागरिकांसह शेरु सिंगला चांगलाच चोप दिला.
या कामगाराला चोप देतानाचा व्हिडीओ वायरल झाल्यानंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी शेरु सिंगला ताब्यात घेतलं. मात्र, त्याच्याविरोधात कोणीही तक्रार न दिल्याने रात्री उशिरा त्याला सोडून देण्यात आलं.
दरम्यान, मारहाण करणारा चालक बाटलीत पेट्रोल मागत होता. ते न दिल्याने त्याने कामगाराला नागरिकांच्या मदतीने मारहाण केल्याचा आरोप पंपावरील इतर कामगारांनी केला.
याबाबत पंप व्यवस्थापक विजय यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत उडवाउडवीची उत्तर देत कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला.
मापात पाप करणाऱ्या पेट्रोल पंप कामगाराला नागरिकांकडून चोप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Feb 2018 10:03 PM (IST)
मापात पाप करणाऱ्या एका पेट्रोल पंपावरील कामगाराला नागरिकांनी चांगलाच चोप दिल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -