मुंबई : कोरोनाविरूद्धच्या लढाईत खबरदारीची उपाययोजना म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यभरात तब्बल 22 हजार 118 खोल्यांची सज्जता करण्यात आली आहे. या ठिकाणी 55 हजार 707 खाटांची सोय होऊ शकेल. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे. यासंदर्भात ते म्हणाले की, कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर झाले आहे. राज्यातील परिस्थितीत नियंत्रणात आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. कोरोनाबाधितांचा आकडा वेगाने वाढत असल्याने राज्य सरकार अलर्टवर आले असून त्यासाठीच्या उपाययोजना केल्या जात आहे.


राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, गरज भासलीच तर राज्य सरकारने सर्व प्रकारची तयारी केली आहे. याच तयारीचा एक भाग म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेल्या शेकडो शासकीय इमारतींमधील 22 हजार 118 खोल्या प्रशासनासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये विश्रामगृहे, वस्तीगृहे, नवीन बांधकाम झालेल्या मात्र अद्याप लोकार्पण न झालेल्या शासकीय इमारती आदींचा समावेश आहे. या ठिकाणी वीज, पाणी अशा सुविधा देखील उपलब्ध असतील. या खोल्यांचा वापर विलगीकरण तसेच तात्पुरत्या स्वरूपातील रूग्णालय म्हणून केला जाऊ शकतो. आपात्कालीन यंत्रणेने यातील अनेक इमारतींचा वापर देखील सुरू केला आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार हे कर्मचारी हवे त्यावेळी उपलब्ध असतील, अशीही माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.


बाळासाहेब थोरात यांचे सरकारी कर्मचाऱ्यांना पत्र , म्हणाले....


अत्यावश्यक सेवा सुरुच राहणार
कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांसाठी लॉकडाऊन केलं आहे. मात्र, देशात लॉकडाऊन असले तरी अत्यावश्यक गोष्टी सुरुच राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. सोबतच राज्यात दोन महिने पुरेल इतक्या अन्यधान्याचा साठा आहे, त्यामुळे लोकांनी याचा साठा करू नये, असेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे गरज तरच बाहेर पडा, असं आवाहनही नागरिकांना केलं आहे. दरम्यान, राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 116 वरून 122 झाली आहे. आज सकाळी सांगली येथील एकाच कुटुंबातील 5 सदस्य संसर्गातून बाधीत आढळून आले आहेत. मुंबई येथे 4 जण कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले तर आता मुंबईत नव्याने 5 आणि ठाणे येथे 1 रुग्ण आढळून आला आहे.


Special Report on Kolhapur Blood Donation | ही रांग आहे... दुसऱ्याला जगवण्यासाठीची! रक्तदान करण्यासाठी लोकांची गर्दी