BMC Action Againest Employee: मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election Result 2024) कामातून कार्यमुक्त करूनसुद्धा मुंबई महापालिकेचे (BMC) 4 हजार 393 कर्मचारी अधिकारी अजूनही कामावर रुजू झाले नाहीत. कार्यमुक्त करूनसुद्धा महापालिकेच्या कामावर रुजू न झालेल्या मुंबई महापालिकेच्या 123 कर्मचाऱ्यांचं वेतन रोखलं आहे. कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मुंबई महापालिकेकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. 


लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ज्या कामासाठी मुंबई महापालिकेचे 11 हजार 851 कर्मचारी कार्यरत होते. 4 जून रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतरसुद्धा अजूनही 4 हजार 393 कर्मचारी मुंबई महापालिकेच्या विविध विभागात  कामावर रुजू झालेले नाहीत. 


मुंबईत पावसाला सुरुवात झाली असताना अनेक कामं मुंबई महापालिकेची कर्मचाऱ्यांच्या अभावी रखडलेली आहेत. मागील आठवड्यात या संदर्भात मुंबई महापालिका आयुक्तांनी मुंबईच्या दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून मुंबई महापालिकेचे जे  कर्मचारी निवडणुकीच्या कामांसाठी पाठवण्यात आले होते. त्यांना कार्यमुक्त करावं, अशा प्रकारचं पत्र दिलं होतं. त्यानंतर  मुंबईतील विधान परिषदेच्या दोन जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी काही अधिकारी कर्मचारी वगळता इतरांना आपण कार्यमुक्त केल्याचं स्पष्टीकरण जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आलं आहे.   


लोकसभेच्या कामातून कार्यमुक्त केल्यानंतरही अद्याप 4 हजार 393 कर्मचारी कामावर रुजू झालेले नाहीत. यामध्ये काही अधिकारी कर्मचारी हे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या कामासाठी लावण्यात आले आहेत. मात्र, त्यांच्याव्यतिरिक्त इतर कर्मचारी अद्यापही कामावर आलेले नाहीत. 


मुंबई महापालिकेनं 13 जूनपासून कामावर रुजू झाल्यास वेतन रोखण्यात येईल, अशा प्रकारचा इशारा देत कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आता 123 मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचं वेतन कामावर रु