Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनारुग्णांची (Mumbai Corona Update) संख्या मागील काही दिवस अतिशय कमी आढळत आहे. आज मुंबईत 38 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. काल 36 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार नवे 38 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 57 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
मुंबई पालिका क्षेत्रात (BMC) आज देखील एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या देखील 292 झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. आज एकाही कोरोनाबाधित रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही.
राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या सातत्याने कमी येत असल्याचं चित्र आहे. बुधवारी राज्यात केवळ 119 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर दोन जणांना आपला प्राण गमवावा लागला. गेल्या 24 तासांमध्ये राज्यामध्ये 138 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. हे चित्र दिलासादायक असंच आहे.
1 एप्रिलपासून राज्यात कोरोना निर्बंध शिथील होण्याची शक्यता
कोरोना महासाथीमुळे मागील दोन वर्षांपासून निर्बंधात वावरणाऱ्या जनतेला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. येत्या एक एप्रिलपासून राज्यात कोरोना निर्बंध शिथील (Covid Restrictions) करण्यात येण्याची शक्यता आहे. आज अथवा गुरुवारी याची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. निर्बंध शिथील केले तरी मास्कचा वापर अनिवार्य असणार आहे.
संबंधित बातम्या
Coronavirus Updates: आनंदवार्ता! राज्यात 1 एप्रिलपासून राज्यात कोरोना निर्बंध शिथील होण्याची शक्यता
India Coronavirus : कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात; गेल्या 24 तासांत 1,233 नवे रुग्ण, तर 31 मृत्यू
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha