India Coronavirus Update : देशात कोरोनाचा (Covid-19) प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. देशातील दैनंदिन रुग्णसंख्येत सातत्यानं चढ-उतार होत असल्याचं दिसून येत आहे. आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 1,233 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 31 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, 1876 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, सध्या देशात केवळ 14 हजरा 704 सक्रिय रुग्ण आहेत. तसेच, कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा आकडा 4.24 कोटींवर पोहोचला आहे.
देशातील कोरोना स्थिती :
- एकूण कोरोना रुग्ण : 4,30,23,215
- देशातील सक्रिय रुग्णसंख्या : 14,704
- कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या : 4,24,87,410
- एकूण मृत्यू : 5,21,101
- लसीकरणाचा एकूण आकडा : 1,83,82,41,743
महाराष्ट्रात कोरोनाचे 103 रुग्ण
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 103 रुग्ण आढळून आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, यादरम्यान, एकही मृत्यू झालेला नाही. या दरम्यान 107 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 960 वर पोहोचली आहे. तसेच, मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 36 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यानंतर आतापर्यंत मुंबईतील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा एकूण आकडा वाढून 1,057,915 वर पोहोचला आहे.
मुंबईत शून्य मृत्यू
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवस अतिशय कमी आढळत आहे. आज मुंबईत 36 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार नवे 36 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 26 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबई पालिका क्षेत्रात (BMC) आज देखील एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या देखील 300 झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. काल एकाही कोरोनाबाधित रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Coronavirus Updates: आनंदवार्ता! राज्यात 1 एप्रिलपासून राज्यात कोरोना निर्बंध शिथील होण्याची शक्यता
- Mumbai Corona Update : मुंबईत मंगळवारी 36 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 26 जण कोरोनामुक्त
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha