मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 32 वर गेल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात 80 संशयित असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांची दिली आहे. रुग्णांना जेवण, टीव्ही, वायफाय सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांची तपासणीदेखील लवकर होणे गरजेचं आहे. त्यासाठी लॅब्सची क्षमता दुप्पट करण्याचाही प्रयत्न आहे. येत्या 15 ते 20 दिवसात मुंबई, पुण्यात नवीन लॅब सुविधा देणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. तसेच मिरज, सोलापूर, धुळे, औरंगाबादमध्येही नवीन लॅब संदर्भातला निर्णय होऊ शकतो, असंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.
दोन दिवसात केईम मध्ये प्रयोगशाळा निर्माण करून रुग्णाची टेस्ट केली जाणार आहे. जे जे रुग्णालय ,हाफकीन आणि पुणे येथेही नवी लॅब्स उभारण्यात येणार आहेत. कस्तुरबा रुग्णालयातील बेडची क्षमता 100 पर्यंत केली जाणार आहे. येत्या दोन-तीन दिवसात 1000 बेडची व्यवस्था केली जाणार आहे. सेव्हन हिल्स रुग्णालयात 400 बेड्सची सुविधा करण्यात आली आहे. डॉक्टर रात्रंदिवस आपलं कर्तव्य बजावत आहेत. त्यांनाही काम करताना अडचण येऊ नये म्हणून सर्व यंत्रणा पुरवली जाणार आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
एमपीएसची परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती
एपीएससीच्या परीक्षेसाठी हजारो विद्यार्थी एकत्र जमतात. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी एमपीएससीची परीक्षाची रद्द करण्याची विनंती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला करण्यात येणार आहे. ही परीक्षा 30 मार्चनंतर घेण्यात यावी असं सुचवण्यात येत आहे. तसेच घरगुती, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम थांबवण्याचे आदेशही प्रशासनाला दिले आहेत. आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाईच्या सूचना काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या असल्याची माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली.
संबंधित बातम्या :
- राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 32 वर, मुंबईत आजपासून जमावबंदी लागू, प्रशासनासमोर आव्हान
- इराणमधल्या अडकलेले 234 भारतीय मायदेशी परतले
- #Coronavirus | मुंबई आयआयटीचे वर्ग, प्रयोगशाळा 29 मार्चपर्यंत बंद
- बेळगावमध्ये दोघांची कोरोना वार्डात तपासणी