नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये धोकादायक स्थितीत असलेल्या इमारतींची नावे महानगर पालिकेने जाहीर केली आहेत. 315 धोकादायक इमारतींमध्ये 53 इमारतही अती धोकादायक आहेत. या धोकायदायक इमारतींमध्ये सुमारे 28 हजार रहिवासी राहत असून, त्या खाली करण्याच्या नोटीस नवी मुंबई महानगर पालिकेने पाठवल्या आहेत.
विशेष म्हणजे धोकादायक इमारती खाली करण्याची नोटीस महापालिकेने पाठवल्या. मात्र, रहिवाशांनी घरे खाली केली आहेत का, याची माहिती मात्र पालिकेने घेतलेली नाही.
धोकादायक स्थितीमध्ये असलेल्या इमारतींमध्ये रहिवाशांनी राहू नये असे फर्मान महापालिकेने काढले असले, तरी त्या रहिवाशांसाठी कुठेही संक्रमण शिबीर तयार करण्यात आलेले नाही. त्यामुळे दरवर्षी पालिका धोकादायक इमारती घोषित करण्याचे सोयीस्कर पूर्ण केल्यानंतर तिकडे लक्ष देत नाहीत.
शहरात 315 धोकादायक इमारती असून 53 इमारती अति धोकादायक आहेत. त्या खाली करण्यासाठी पालिकेने नोटीस दिल्या आहेत. नोटीस दिल्यानंतर धोकादायक इमारतींमधील रहिवाशांनी ती जागा खाली केली आहे का याची माहितीसुद्धा पालिकेकडे नाही.
गेल्या 20 वर्षांपासून धोकादायक इमारत असल्याने सिकडो आणि पालिका दरबारी रहिवासी इमारत पुनर्विकासाठी परवानग्या मागत आहेत. मात्र अद्यापपर्यंत पालिकेने कोणत्याही इमारतीला परवानगी दिलेली नसून फक्त कागदी घोडे नाचवत असल्याचा आरोप रहिवाशी करीत आहेत. त्यामुळे घाटकोपरप्रमाणे नवी मुंबईमध्ये इमारत पडून लोकांचे जीव गेल्यानंतर पालिका पुनर्विकास करायला परवानगी देणार का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
नवी मुंबईतील 28 हजार रहिवासी धोकादायक इमारतीत!
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई
Updated at:
27 Jul 2017 09:34 PM (IST)
नवी मुंबईमध्ये धोकादायक स्थितीत असलेल्या इमारतींची नावे महानगर पालिकेने जाहीर केली आहेत. 315 धोकादायक इमारतींमध्ये 53 इमारतही अती धोकादायक आहेत. या धोकायदायक इमारतींमध्ये सुमारे 28 हजार रहिवासी राहत असून, त्या खाली करण्याच्या नोटीस नवी मुंबई महानगर पालिकेने पाठवल्या आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -