मुंबई: लोकलमधून खाली पडून गंभीररित्या जखमी झालेल्या तेजश्री वैद्यला मदतीची दरज आहे. 3 महिन्यापूर्वी 23 वर्षीय तेजश्री वैद्य शीव ते माटुंगा प्रवासादरम्यान लोकलमधून पडली. त्यात ती गंभीर जखमी झाली आहे. तिला लो. टिळक रुग्णालयामध्ये दाखल केलं. तेजश्रीला अजूनही सगळ्या संवेदना नाहीत. मोठ्या मुश्किलीने ती डावा पाय हलवू शकते आणि डावा डोळा उघडते.

तिच्या उपचारावर हजारो रुपये खर्च होतात. पण रेल्वेकडून अद्यापही तिला आर्थिक मदत मिळाली नाही.

तिच्यावर उपचार करण्यासाठी एक थेरपी सुचविण्यात आली आहे. ती लोकमान्य टिळक रुग्णालयात उपलब्ध नाही. त्यामुळे तिला रहेजा रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या थेरपीमध्य एका विशिष्ट प्रकारच्या मशिनमध्ये तिला काही वेळासाठी ठेवण्यात येते. अतिरिक्त ऑक्सिजनचा पुरवठा झाल्यामुळे तेजश्रीचे शरीर अधिक वेगाने कार्यक्षम होईल, असा डॉक्टरांचा अंदाज आहे. ही प्रक्रिया करण्यासाठी दिवसाचा खर्च 14 हजार रुपये आहे.

हा खर्च वैद्य कुटुंबाला परवडत नाही. या अपघातासाठी जबाबदार असलेल्या रेल्वेकडून आर्थिक सहाय्य मिळणे अपेक्षित आहे, प्रत्यक्षात मात्र रेल्वेने कोणतेही सहकार्य केलेले नाही.

तेजश्री वैद्यला मदत करण्यासाठी तिचे वडील श्रीराम वैद्य यांच्याशी 7715074729 या नंबरवर संपर्क साधा.