मुंबई : मुंबईतील बोरीवली पश्चिम गोराई इथे एका 15 वर्षीय मुलीचा बाथरुममध्ये आंघोळ करत असताना मृत्यू झाला. गिझरमधून आलेल्या विषारी वायूमुळे तिचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. ध्रुवी गोहिल असं या मुलीचं नाव असून ती दहावीत शिकत होती. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीच ध्रुवीचा वाढदिवस होता.
ही घटना 10 जानेवारीची ही घटना आहे. ध्रुवी गोहिल सकाळी आंघोळीसाठी गेली. मात्र तासाभरानंतरही ती बाथरुममधून बाहेर आली नाही. त्यामुळे घरच्यांनी बाथरुमचा दरवाजा ठोठावला. दरवाजा आतून बंद होता. घरच्यांनी जोर लावून दरवाजा उघडला तेव्हा ध्रुवी बेशुद्धावस्थेत पडली होती. शिवाय तिचा पाय गरम पाण्यामुळे भाजला होता. तसंच चार फुटांपर्यंत विषारी वायू बाथरुममध्ये पसरलेला होता. कुटुंबियांना तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र 24 तासानंतर म्हणजेच 11 जानेवारीला तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या वायूचा कुठलाही रंग नसतो किंवा याला कसलाही वास नसतो. त्यामुळे तो गॅस पसरल्यास पटकन समजत नाही. या गॅसमुळे ध्रुवीच्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही आणि ती बेशुद्ध पडली, अशी माहिती मंगलमूर्ती रुग्णालयाचे डॉक्टर विवेक चौरसिया यांनी दिली.
आपल्या मुलीसोबत जी घटना घडली ती अजून कोणासोबत घडू नये यासाठी ध्रुवीच्या वडिलांनी लोकांना गिझर बाथरुमबाहेर लावण्याचा आग्रह केला आहे. तसंच पाणी शक्यतो गरम करुन वापरण्यास सांगितलं आहे, जेणेकरुन अजून कुठल्या कुटुंबावर ही वेळ येणार नाही.
कोणत्या परिस्थितीत गिझर घातक?
- बाजारात इलेक्ट्रिक गिझरला जास्त मागणी आहे. मात्र, गेल्या काही वर्षात अनेक जण गॅस गिझरचा पर्यायही निवडू लागले आहेत. गॅस गिझरच्या बाथरुममध्ये व्हेंटिलेशन नसेल तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते.
- गॅस गिझरमुळे वाफ तयार होते. बाथरुमधून वाफ बाहेर जाण्यासाठी मार्ग नसेल तर मोठ्या प्रमाणावर वाफ साठत जाते आणि त्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. परिणामी, तेथे कार्बन डायऑक्साईड तयार होण्यास सुरुवात होते.
- त्यानंतरही गॅस गिझर चालूच राहिला तर ऑक्सिजन नाहीसा होऊन संपूर्ण कार्बन डायऑक्साईड तयार होतो. त्यामुळे श्वास गुदमरतो, असं तज्ज्ञ सांगतात.
गॅस गिझर वापरताना काय काळजी घ्यावी?
- बाथरुममध्ये 'एक्झॉस्ट फॅन' असेल तर व्हेंटिलेशन/वायू व्हिजन चांगलं होईल आणि दुर्घटना टळेल.
- गॅस गिझरचा मेन्टेनन्स वेळच्या वेळी करणं गरजेचं.
- गॅस गिझर शक्यतो बाथरुमच्या बाहेरच लावा.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईत बाथरुममध्ये गुदमरुन मुलीचा मृत्यू, गिझरमधील वायूमुळे दुर्दैवी अंत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Jan 2020 03:02 PM (IST)
ध्रुवी गोहिल सकाळी आंघोळीसाठी गेली. मात्र तासाभरानंतरही ती बाथरुममधून बाहेर आली नाही. घरच्यांनी जोर लावून दरवाजा उघडला तेव्हा ध्रुवी बेशुद्धावस्थेत पडली होती.
NEXT
PREV
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -