मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील अनेक ठिकाणी यंदाच्या पावसाळ्यात घर पडणे, इमारत किंवा इमारतीचा भाग कोसळणे, शॉक लागणे, नाल्यात समुद्रात वाहून जाणे, बुडणे आदी दुर्घटना घडल्या असून त्यामध्ये तब्बल 137 नागरिकांचा मृत्यू झाला तर 579 नागरिक जखमी झाले आहेत. यासंदर्भातील माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने माहिती अधिकार कार्यकर्ते शकील शेख यांना दिली आहे.
या आकडेवारीनुसार 2019 मध्ये घर पडणे, इमारत किंवा इमारतीचा भाग कोसळणे, शॉक लागणे, नाल्यात समुद्रात वाहून जाणे, बुडणे अशा प्रकारच्या 9,943 आपत्कालीन दुर्घटना घडल्या आहेत. त्यामध्ये 137 जणांचा मृत्यू झाला आहे तर 579 जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये 372 पुरुष तर 207 महिलांचा समावेश आहे.
सहा वर्षात 978 नागरिकांचा मृत्यू
2013 ते 2018 या सहा वर्षात 49 हजार 179 दुर्घटना घडल्या आहेत. त्यामध्ये 987 लोकांचा मृत्यू झाला तर 3066 जण जखमी झाले आहेत. या वर्षभरात आग, शॉर्टसर्किटच्या 3032 घटना घडून 17 लोकांचा मृत्यू तर 127 लोक जखमी झाले. तसेच घर, घरांचे भाग, भिंती, इमारती, इमारतींचे भाग कोसळण्याच्या 622 घटना घडून 51 लोकांचा मृत्यू झाला तर 227 लोक जखमी झाले. तसेच झाडं, झाडांच्या फांद्या पडण्याच्या 3364 घटना घडल्या असून त्यात पाच लोकांचा मृत्यू झाला तर 21 लोकं जखमी झाले आहेत.
त्याचप्रमाणे समुद्रात, नाल्यात, नदीत, विहिरीत, खाडीत, खदानात, मॅनहोलमध्ये पडण्याच्या 103 घटना घडून त्यामध्ये 39 लोकांचा मृत्यू झाला तर 27 लोक जखमी झाले आहेत.
तसेच दरड कोसळण्याच्या 25 घटना घडल्या आहेत मात्र त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शॉक लागण्याच्या 114 घटना घडून त्यामध्ये पाच लोकांचा मृत्यू झाला तर 13 लोक जखमी झाले आहेत. रस्ते खचणे, खराब रस्त्यांमुळे 161 घटना घडल्या असून त्यामध्ये 11 लोकांचा मृत्यू झाला तर 53 लोक जखमी झाले आहेत. तसेच पूल, पादचारी पूल पडण्याच्या 67 घटना घडून सहा लोकांचा मृत्यू झाला आणि 34 लोक जखमी झाले. अन्न विषबाधेच्या पाच घटना घडल्या मात्र त्यात जीवितहानी झाली नाही परंतु 34 लोक जखमी झाले. गॅस गळतीच्या 185 घटना घडल्या असून त्यात दोन लोकांचा मृत्यू झाला असून 15 लोक जखमी झाले. तसेच रस्त्यावर ऑईल पडण्याच्या 615 घटना घडून एकाचा मृत्यू झाला तर 27 लोकं जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे.
मुंबईत एका वर्षात विविध दुर्घटनांमध्ये 137 लोकांचा मृत्यू, 579 जखमी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Sep 2019 07:53 AM (IST)
2019 मध्ये घर पडणे, इमारत किंवा इमारतीचा भाग कोसळणे, शॉक लागणे, नाल्यात समुद्रात वाहून जाणे, बुडणे अशा प्रकारच्या 9,943 आपत्कालीन दुर्घटना घडल्या आहेत. त्यामध्ये 137 जणांचा मृत्यू झाला आहे तर 579 जण जखमी झाले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -