चार मुली आणि सात मुलं बुडत असताना तेथील पोलीस कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता समुद्रात उडी मारली. त्यानंतर स्पीड बोटच्या सहाय्याने त्या अकरा जणांना सुखरूप बाहेर काढलं.
पोलीस कर्मचारी अजित शिंदे, समीर भोईर आणि नंदीरबाळ शिंदे या तिघांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतली आणि बुडणाऱ्या तरुणांना वाचवलं.
बँडस्टँड या ठिकाणी तरुण, तरुणी नेहमीच बसत असतात. मात्र आज काही जण अचानक हायटाईडमध्ये अडकले. सुदैवाने त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तातडीने पाण्यात उडी घेतली आणि सर्वांना सुखरुप बाहेर काढलं.