Mumbai Maratha Protest: एरवी घडीच्या काट्यावर चालणारी राज्याची राजधानी मुंबई गेल्या चार दिवसांपासून ठप्प झाली होती. अशातच मुंबईतील महत्त्वाचे केंद्र असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकाच्या परिसरात मराठा आंदोलकांनी चक्का जाम केलं होतं. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यासोबत आलेल्या मराठा आंदोलकांनी याठिकाणी आपल्या गाड्या लावल्या होत्या. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी दक्षिण मुंबईतील आझाद मैदान वगळता सर्व परिसर खाली करावा, असे आदेश दिले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कारवाईला सुरुवात केली आहे. तर मनोज जरांगे पाटील यांनीही आझाद मैदान सोडून मराठा आंदोलकांनी इतरत्र फिरु नये, असे कालच स्पष्ट केले होते. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानंतर आणि मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केल्यानंतर सीएसएमटी परिसर मराठा बांधवाकडून रिकामा केला जात आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोध दाखल याचिकांवर आज पुन्हा सुनावणी होणार असून आजच्या सुनावणीत नेमकं काय होतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष लागले आहे.
अटी शर्तींच उल्लंघन झाल्याने नियमानुसार कारवाई करण्याचे राज्य सरकारला निर्देश
पोलिसांकडून सीएसएमटी स्थानकाबाहेरील परिसरात उभ्या असलेल्या मराठा आंदोलकांच्या (Maratha Reservation) गाड्यांना हटवले आहे. मराठा आंदोलकांच्या या गाड्या नवी मुंबईत नेण्यात याव्यात, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता सीएसएमटी स्थानकाबाहेरील रस्ता मोकळा झाला असून तेथून वाहतूक पूर्ववत सुरु झाली आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोध दाखल याचिकांवर आज पुन्हा सुनावणी होणार आहे. दुपारी एक वाजता नियमित खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष लागले आहे.
दुपारी 12 वाजेपर्यंत आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर ठिकाण खाली होतील, याची मनोज जरांगे पाटील आणि इतरांनी खात्री करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. तर मुंबईत नव्याने आंदोलकांना प्रवेश न देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले होते. राज्य सरकारने घातलेल्या अटी शर्तींच उल्लंघन झाल्याने तसेच आंदोलनाला कोणतीही परवानगी नसल्याने नियमानुसार कारवाई करण्याचे राज्य सरकारला निर्देश दिले होते त्यानुसार आता काय कारवाई होते हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.