त्यानंतर शनिवारी भवार यांनी अहिरेकर यांना अंबरनाथच्या महात्मा गांधी शाळेजवळ भेटायला बोलावलं, तिथे या दोघांमध्ये झालेल्या वादानंतर भवार आणि त्यांच्या अंगरक्षकांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप अहिरेकर यांनी केलाय. अहिरेकर हे सध्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अंबरनाथ विधानसभा अध्यक्ष म्हणून कार्यरत असून त्यांना झालेल्या मारहाणीमुळे मनसे विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद निर्माण झाला आहे. तर अहिरेकर याने आपल्याला आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिवीगाळ केली. तसंच आपल्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळेच त्याला मारहाण केल्याची कबुली सुमेध भवार यांनी दिली आहे. याप्रकरणी भवार आणि त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल झाला असून अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी अहिरेकर यांनी केली आहे.
अंबरनाथ शहरात ऐन निवडणुकीत मनसेतली अंतर्गत नाराजी उफाळून आली होती. पक्षातले अनेक पदाधिकारी प्रचारातून गायब होते. यापैकी काही जण शिवसेनेचा छुपा प्रचार करत असल्याची तक्रारी वरिष्ठांकडे केल्या होत्या. त्यामुळे पक्षविरोधी काम करणाऱ्यांना काढून टाकणार असा इशारा मनसे नेते राजन गावंड यांनी दिला होता. अंबरनाथमध्ये पक्षातील इच्छुकांना डावलून ऐनवेळी भाजपतून आलेल्या सुमेध भवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे पक्षातील एक मोठा गट नाराज झाला होता. नाराजांपैकी काही जण शिवसेनेचा छुपा प्रचार करत असल्याच्या तक्रारी वरिष्ठांकडे केल्या होत्या.
संबंधित बातम्या
वारंवार थुंकून चाटणे योग्य नाही, अबू आझमींचा राज ठाकरेंना सल्ला
अंबरनाथमधील मनसेत अंतर्गत नाराजी उफाळली, प्रचारातून पदाधिकारी गायब
भाजपच्या चालीपुढे राज ठाकरे 'चेक मेट'?