अंबरनाथ : अंबरनाथ शहरात ऐन निवडणुकीत मनसेतली अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. पक्षातले अनेक पदाधिकारी प्रचारातून गायब आहेत. यापैकी काही जण शिवसेनेचा छुपा प्रचार करत असल्याची तक्रारी वरिष्ठांकडे गेल्या आहेत. त्यामुळे पक्षविरोधी काम करणाऱ्यांना काढून टाकणार असा इशारा मनसे नेते राजन गावंड यांनी दिला आहे.
अंबरनाथमध्ये पक्षातील इच्छुकांना डावलून ऐनवेळी भाजपातून आलेल्या सुमेध भवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे पक्षातील एक मोठा गट नाराज झाला असून हा गट प्रचारातूनही गायब आहे. मनसेने बुधवारी (16 ऑक्टोबर) निवडणुकीचा वचकनामा प्रसिद्ध केला. यावेळीही मनसेचा मोठा गट अनुपस्थित होता. त्यामुळे ही नाराजी प्रखरतेने जाणवली.
नाराजांपैकी काही जण शिवसेनेचा छुपा प्रचार करत असल्याच्या तक्रारी वरिष्ठांकडे गेल्या आहेत. त्यामुळे अशा पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल आणि त्यांना पक्षातून काढून टाकण्यात येईल, असा इशारा मनसे नेते राजन गावंड यांनी दिला आहे. त्यामुळे नाराजांना समजावूनही काही होत नसल्याने आता मनसेने थेट कारवाईचा पवित्रा घेतला आहे.
अंबरनाथमधील मनसेत अंतर्गत नाराजी उफाळली, प्रचारातून पदाधिकारी गायब
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Oct 2019 11:27 AM (IST)
अंबरनाथमध्ये पक्षातील इच्छुकांना डावलून ऐनवेळी भाजपातून आलेल्या सुमेध भवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे पक्षातील एक मोठा गट नाराज झाला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -