Ashish Shelar: मुंबईत भाषेवरून मस्तवालपणा आणि गुर्मी दाखवणाऱ्यांना मनसेकडून जागेवर चोप देत अद्दल घडवण्यात येत आहे. मराठीच्या मुद्यावरून ठाकरे बंधूंनी एकीची हाक दिल्यानंतर भाजप नेत्यांनी आता मनसेविरोधात मोर्चा खोलला आहे. मंत्री आशिष शेलार यांनी मनसैनिकांची थेट पहलगाम दहशतवाद्यांशी केली आहे. शेलारांच्या वक्तव्याचा मनसेकडून समाचार घेतला जात असतानाच सोशल मीडियात शेलारांच्या वक्तव्याचा समाचार घेत सडकून टीका सुरु आहे. ही टीका होत असतानाच आजपर्यंत विखारी वक्तव्ये करत आलेल्या भाजप खासदार निशिकांत दुबे यांनीही ठाकरे बंधूंना थेट आव्हान दिले आहे आणि म्हटले आहे की जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी उर्दू भाषिकांवर हल्ला करावा.
निशिकांत दुबे यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वरील पोस्टमध्ये लिहिले आहे की जर मुंबईत हिंदी भाषिकांवर हल्ला करणाऱ्यांमध्ये खरी ताकद असेल तर त्यांनी महाराष्ट्रातील उर्दू भाषिकांना मारून दाखवावे. त्यांनी असेही म्हटले आहे की कुत्राही आपल्या घरात शेर असतो. शेवटी, कोण कुत्रा आहे आणि कोण शेर आहे, हे जनता स्वतः ठरवेल.
निशिकांत दुबे यांची काश्मीरशी तुलना
निशिकांत दुबे यांनी यापूर्वी एका पोस्टमध्ये हा मुद्दा काश्मीरशी जोडला होता आणि म्हटले होते की ज्याप्रमाणे काश्मीरमधील दहशतवाद्यांनी काश्मिरी हिंदूंना हाकलून लावले, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील काही राजकीय पक्ष आता हिंदी भाषिकांना लक्ष्य करत आहेत. या विधानात त्यांनी उद्धव ठाकरे, राज ठाकरे तसेच शरद पवार यांची तुलना काश्मीरच्या दहशतवाद्यांशी केली आणि म्हटले की एकेकाळी हिंदू असल्याने लोकांना लक्ष्य केले जात होते आणि आता हिंदी बोलल्याबद्दल त्यांच्यावर हल्ला केला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या