Marathwada Rain Update : राज्यासह मराठवाड्यात देखील पावसाचा कहर बघायला मिळतो आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाचा सारी कोसळताय. परिणामी मराठवाड्यातील (Marathwada Weather Update) दुसरे मोठे धरण असलेल्या परभणीच्या येलदरी धरणाचे (Yeldari Dam) पूर्ण 10 दर्जाचे उघडण्यात आले आहेत. ज्यातून 52 हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात केला जातोय. त्यामुळे पूर्णा नदीला पूर आलाय. तर मराठवाडा-विदर्भाला जोडणारा पूल हा पूर्णतः पाण्याखाली गेलाय. त्यामुळे मागच्या 19 तासापासून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.
मराठवाड्यात पावसाचं धुमशान सुरूच; शेत-शिवार, रस्ते जलमय
बीडच्या परळी तालुक्यातील कौडगांव हुडा शिवारातील तेलेसमुख रोडवर असलेल्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने आणि पाण्याचा अंदाज न आल्याने बलेनो कार वाहुन गेलीय. त्यामध्ये एकुण 4 व्यक्ती होते. मध्यरात्री स्थानिक प्रशासनाने 1 ते 4 वाजेदरम्यान शोध घेतला असता 3 व्यक्तींना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. तर एक व्यक्ती अद्याप बेपत्ता आहे. सध्या त्यांचा शोध घेण्यासाठी पुणे येथून एनडीआरएफ टिम घटनास्थळी रवाना झाली आहे.
लातूर जिल्ह्यातील गावांचा संपर्क तुटला
लातूर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस कोसळतोय. परिणामी जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होऊन अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ज्यामध्ये मौजे बोरगाव, धडकनाळ तालुका उदगीर या गावाचा संपर्क तुटला आहे. तर स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या हि 70 कुटुंब असून एकूण स्थलांतरितांची संख्या 210 इतकी आहे.
मुखेड तालुक्यात पावसामुळे अडकलेल्या गावांमध्ये शोध व बचाव कार्य सुरु
दुसरीकडे, मुखेड तालुक्यात पावसामुळे अडकलेल्या गावांमध्ये शोध व बचाव कार्य सुरु आहे. अंदाने 225 नागरिकांपैकी अतिशय प्रतिकूल परिस्थितीन अडकलेले 7-8 जणांना सुखरुपपणे वाचवले आहे. मस्जीदबर येथे अंदाज 4-5 नागरीक अडकलेले आहेत. त्यांचा शोध व बचावाची कार्यवाही पथकाकडून चालु आहे. हसमा येथे अंदाजे 7-8 नागरीक अडकलेले आहेत त्यांचा शोध व बचावाची कार्यवाही पथकाकडून चालू आहे. तर भासबाडी येथे सुमारे 20 नागरिक सुरक्षित आहेत, त्यांच्या बचावासाठी पथकाला पाचारण करण्यात आलं आहे. भिगेली येथ सुमारे 40 नागरिक सुरक्षित आहेत. दरम्यान या सगळ्या गावात शोथ व बचाव कार्यासाठी सैन्य दलाला प्राचारण करण्यात आले आहे.
देगलूरच्या मौजे होसणी परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस चालू आहे. त्यामुळे लंडी नदीला भरपूर प्रमाणात पूर आला असून पुराचे पाणी पुलावरून वाहत आहे. बाहेरगावी जाण्यासाठी चहुबाजूने रस्ता बंद झाला आहे.
दुसरीकडे, मराठवाडा व विदर्भाला जोडणाऱ्या पैनगंगा नदीवरील शिकार ता. हदगाव येथील पुलावरून पाणा वाहत आहे. बाभळी ता. हदगाव प्रेथ पैनगंगा नदीच्या पुराचे पाणी गावाच्या शिवारात आले असून पुराचे प शाहे पाऊस चालू असून बाभळी दळणवळणाचा रस्ता बंद आहेकोणतीही जीवित हानी नाही चाभळी येथे पराचे पाणी गावाच्या शिवारात आले असून पुराचे पाणी सच्या स्थिर आहे पाऊस चालू असून बाभळी देऊ पिता चंद आहे
वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीला पुराचा धोका वाढला
गेल्या चार दिवसां पासून बरसत असलेल्या जोरदार पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील पेनटाकळी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून मोठ्या प्रमाणात पैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला असून प्रशासनाकडून नदीकाठच्या गावातील शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी स्वतः चिंचांबा पेन गावात जाऊन नागरिकांना सुरक्षित स्थळी येण्याची विनंती केली. तर जे लोक येण्यास तयार नव्हते त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला. वाशिम जिल्ह्यात आधीच मुसळधार पाऊस झाल्याने पैनगंगा नदीला मोठा पूर आला होता त्यातच पेन टाकळी धरणातून विसर्ग सुरू झाल्याने पुराचा धोका आणखी वाढलाय.