Horoscope Today 19 August 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 19 ऑगस्ट 2025, आजचा वार मंगळवार आहे. आज श्रावणातील मंगळवार असल्याने आजचा दिवस खास आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. श्रीगणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज कौटुंबिक संख्या बाबत प्रचंड तडजोड करावी लागेल, अत्यंत शिस्तीने आणि धोरणीपणे कामाचे नियोजन करा    

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज कुठेही मतभेद झाले तरी समजुतीचे धोरण ठेवावे लागेल, नोकरी व्यवसायात आपण करीत असलेल्या कामाची चांगल्या पद्धतीने तपासणी करा     

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज काहीतरी नवीन करण्याच्या नादात मूळ काम बिघडत नाही ना, याचा विचार आवश्यक करायला हवा 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज थोडा दूरदर्शीपणा ठेवल्यास फायदा होईल, सुचक स्वप्न पडतील 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो आज कोणत्याही गोष्टीचा वास्तवाशी संबंध जोडताना तारतम्याचा वापर करायला हवा 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज प्रत्येक गोष्टीचे नियोजन केल्यास खूप गोष्टी साधून जातील, घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला पटला नाही तरी तोच बरोबर होत आहे मान्य कराल   

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज अध्यात्मिक दृष्ट्या प्रगती होऊ शकते, अधिकाराचे योग संभवतात     

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज वाहने जपून चालवा. जुने दुखणे डोके वर काढतील कोणतीही गोष्ट सहजासहजी घडणार नाही  

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज काही ध्येय गाठण्यासाठी कौटुंबिक विरोध सहन करावा लागेल      

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज राजकारणी लोकांना जनतेचा रोष पत्करावा लागेल, येथे तापटपणा किंवा हुकूमशाही वृत्ती ठेवून चालणार नाही          

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज अहंकार दुखावला गेल्यास थोडे अस्वस्थ व्हाल, स्वभावातील लहरीपणा थोडा जाचक ठरेल         

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज सकारात्मक विचाराने आजच्या दिवसाचे स्वागत करा, म्हणजे कोणत्याही परिस्थितीत यश तुमची साथ सोडणार नाही.

हेही वाचा :           

Weekly Lucky Zodiac Signs 18 to 24 August 2025: पुढचे 7 दिवस 'या' 5 राशींचे भाग्य घेऊन आलेत! जबरदस्त कला राजयोग बनतोय, नोकरीत प्रमोशन, उत्पन्नाचे नवे साधन..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)