मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी 29 ऑगस्टला मुंबईच्या दिशेने कूच करण्याच्या तयारीत असलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarnage Patil) यांच्या आंदोलनापूर्वी मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र सरकारकडून मोठ्या घडामोडी घडत आहे. अशातच नव्याने स्थापन झालेल्या मराठा आरक्षण उपसमितीची पहिली बैठक आज पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज दुपारी 2 वाजता मंत्रालयात हि बैठक संपन्न होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत हि बैठक पार पडणार आहे. मनोज जरांगे पाटील हे 29 तारखेला मुंबईत आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. या आंदोलनाबाबत चर्चाही या बैठकीत होणार आहे. त्यामुळे ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान एबीपी माझाने या बाबत प्रथम माहिती दिली होती. या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झाला असून मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मराठा उपसमितीची आज बैठक पार पडत आहे. मंत्रीमंडळाच्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पोहचले आहेत. त्यामुळे या बैठकीत नेमकं काय घडतं, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मराठा आरक्षण उपसमिती कोणती कामं करणार?
उपसमितीमार्फत मराठा आरक्षणाविषयक प्रशासकीय आणि वैधानिक कामकाजाचा समन्वय ठेवण्यात येणार आहे. न्यायप्रविष्ठ प्रकरणांमधील शासनाच्या वतीनं बाजून मांडण्यासाठी नेमलेल्या समुपदेशींशी समन्वय ठेवण्यात येणार, सोबतच विशेष समुपदेशींना सूचना समितीकडून दिल्या जाणार आहेत. न्यायालयाने पारीत केलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीबाबतची कार्यपद्धती उपसमितीकडून ठरविले जाणार आहे.
न्या. संदीप शिंदे यांच्या समितीसोबत समन्वय ठेवणे. मराठा आंदोलन आणि त्यांचे शिष्टमंडळाशी चर्चा करणे. जातप्रमाणपत्र देण्यात येणाऱ्या अडचणींबाबत निर्णय प्रक्रिया सुरळीत करणे. मराठा समाजासाठी केलेल्या योजना तसेच सारथी आणि आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांच्या मार्फत मराठा समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे, अशी कामं मराठा आरक्षण उपसमितीकडून करण्यात येणार आहेत.
मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मार्ग कसा असणार? (What will be the road map of Manoj Jarange movement?)
- अंतरवालीवरून 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता निघणार...
- अंतरवाली - पैठण -शेवगाव (अहिल्यानगर)..कल्याण फाटा -आळे फाटा, शिवनेरी (जुन्नर मुक्कामी..)
- 28 ऑगस्टला खेड मार्गे चाकण, लोणावळा, वाशी चेंबूर...28 ऑगस्ट रोजी रात्री आझाद मैदानावर पोहचणार.
- 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर आंदोलन करणार...
आणखी वाचा