Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि जलसंधारण विभागाच्या भोंगळ कारभाराविषयीची बातमी समोर आली आहे. जिल्ह्याच्या किन्ही सवडत येथील शेतकरी प्रकाश धुरंदर हे 65 वर्षीय शेतकरी तलावात आपली शेती गेल्याने त्याचा मोबदला मिळावा, म्हणून जलसंधारण विभागाचे कार्यालयात मागील पाच वर्षांपासून चकरा मारत आहेत. मात्र अद्याप त्यांना त्यांच्या शेतीच मोबदला अद्याप मिळाला नाही. शिवाय आतापर्यंत 50 हजार रुपये नुसते अर्ज करण्यात आणि चकरा मारण्यातच गेल्याची खंत आणि रोष त्यांनी बोलताना व्यक्त केला आहे.
अर्ज अन् चकरा मारण्यात गेले 50 हजार रुपये
दरम्यान, कार्यालयात अर्ज करण्यासाठी आणि चकरा मारण्यासाठी त्यांचे 50 हजार रुपयांचे वर पैसे खर्च झाले असल्याचे शेतकरी प्रकाश धुरंदर सांगतात. धुरंदर यांची वैरागड शिवारात शेती असून त्याठिकाणी तलावाचे काम सुरू आहे. या तलावाचे बाधित क्षेत्रात त्यांची 22 गुंठे शेती गेली आहे, विहीर गेली, सिताफळची झाडे गेलीय. मात्र जलसंधारणचे अधिकारी त्यांना कधी 8 गुंठा शेतीचे पैसे घ्या म्हणतात तर कधी 12 गुंठा शेतीचे पैसे घ्या म्हणतात. तर शेतकरी धुरंदर आपल्या संपूर्ण शेतीचे पैसे द्यावे, अशी मागणी वेळोवेळी करत आले असून अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे त्यांना मिळत आहेत. शिवाय जलसंधारण अधिकारी कार्यालयात कधीच राहत नसल्याचे ही शेतकरी धुरंदर सांगताय. आता न्याय कोणाला मागायचा? असाही प्रश्न त्यांनी केला असून शेतीच मोबदला द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis On Manoj Jarange: एकनाथ शिंदे अन् अजितदादांना मराठा आरक्षणाचं काम करु दिलं नाही; मनोज जरांगेंच्या आरोप, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
- Bhandara Guardian Minister Pankaj Bhoyar : संजय सावकारेंचं डिमोशन, भंडाऱ्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागताच पंकज भोयरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले सहा महिन्यांपासून...