Nashik Lok Sabha Election 2024 : शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena UBT) नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नाशकात महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारालाही सुरुवात करण्यात आली आहे. तर दुसरीकडे महायुतीत (Mahayuti Seat Sharing) अजूनही नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम आहे. 


नाशिकला झालेल्या शिवसेना मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी हेमंत गोडसेंच्या (Hemant Godse) नावाची घोषणा केली होती. मात्र या घोषणेचा महायुतीकडून जोरदार विरोध करण्यात आला. त्यानंतर भाजपकडून (BJP) नाशिक मतदारसंघावर दावा ठोकण्यात आला. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देखील नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले.


संघाकडून पर्यायी उमेदवारांची चाचपणी? 


नाशिक लोकसभा मतदारसंघात (Nashik Lok Sabha Constituency) हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ यांना विरोध होत असल्याने महायुतीपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आता महायुतीकडून हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ यांच्या व्यतिरिक्त कोणता पर्यायी उमेदवार विजयी होऊ शकतो, याबाबत चाचपणी सुरु आहे. संघाकडून इतर उमेदवारांची चाचपणी केली जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. 


राहुल ढिकले, अजय बोरस्तेंचे नाव चर्चेत 


तसेच नाशिक पूर्वचे भाजप आमदार राहुल ढिकले (Rahul Dhikle) आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांचे नाव चर्चेत आले आहे. नाशिक लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून अद्याप उमेदवाराचे नाव जाहीर नसल्याने तीनही पक्षांचे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.


महायुतीचा उमेदवार सक्षम असणार - राहुल ढिकले 


याबाबत भाजप आमदार राहुल ढिकले म्हणाले की, माझ्याबाबतीत सर्व्हे चालू या विषयी मला माहिती नाही. जागा भाजपला सुटावी, अशी आम्ही मागणी केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उत्तर महाराष्ट्र प्रभारी गिरीश महाजन (Girish Mahajan) जे निर्णय घेतील तो मान्य असेल. महायुतीचा उमेदवार सक्षम असणार तो निवडून येण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार, असे त्यांनी म्हटले आहे. 


मुख्यमंत्री जे आदेश देतील त्याचे पालन करू - अजय बोरस्ते 


शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते म्हणाले की, मी उमेदवारी मागितली नाही. जागा शिवसेनेला मिळावी ही आमची आजही मागणी आहे. हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळावी ही मागणी आहे. या आधी दोन निवडणुकीत हेमंत गोडसे यांचे प्रचारप्रमुख म्हणून काम केले आहे. शिवसेना आदेशावर चालणारा पक्ष आहेत.  त्यामुळे मुख्यमंत्री जे आदेश देतील त्याचे पालन करू, असे त्यांनी म्हटले आहे. आता महायुतीतून नक्की कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. 


आणखी वाचा 


Manoj Jarange on Chhagan Bhujbal : 'छगन भुजबळ लोकसभेला उभे राहुद्यात, मग सांगतोच'; मनोज जरांगेंनी दंड थोपटले!