Hingoli Loksabha : हिंगोली लोकसभेसाठी (Hingoli Lok Sabah Election 2024) भाजपचे लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर (Ramdas Patil) यांनी अपक्ष उमेदवारी भरली होती. ही उमेदवारी मागे घ्यावी यासाठी रविवारी गिरीश महाजन (Girish Mahajan), भागवत कराड, श्रीकांत भारतीय या भाजपच्या नेते मंडळींनी रामदास पाटील यांच्यासोबत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सुमारे तीन तास चर्चा केली. अखेर गिरीश महाजन यांची शिष्टाई फळाला आली आणि रामदास पाटील यांचे बंड थंड झालं आहे. अपक्ष उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज आज अखेर मागे घेतला आहे. 


रामदास पाटील सुमठाणकर यांची उमेदवारी मागे


उमेदवारी संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुद्धा चर्चा झाली आहे आणि योग्य त्या ठिकाणी न्याय दिला जाईल, असं आश्वासन दिल्याचं सुमठाणकर यांनी सांगितलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी न्याय देण्याचे आश्वासन दिल्याने रामदास पाटील सुमठाणकर यांनी माघार घेतल्याचं स्पष्ट केलं आहे. महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सर्व ताकद लावली जाईल आणि 4 जूनला बाबुराव कदम विजय होतील, अशी माहिती रामदास पाटील सुमठाणकर यांनी दिली आहे. 


अपक्ष उमेदवारी मागे घेण्यासाठी महाजनांची विनंती


रामदास पाटील यांनी अपक्ष उमेदवारी मागे घ्यावे, अशी विनवणी गिरीश महाजन यांनी केली होती. रामदास पाटील यांच्या निवासस्थानी तीन तास बंद दारा आड चर्चा झाल्यानंतर त्यांना सोमवारी माघार घेतली आहे. हिंगोली लोकसभेसाठी महायुतीकडून बाबुराव कदम यांनी उमेदवारी भरलेली असताना सुद्धा भाजपचे लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर यांनी अपक्ष उमेदवारी भरली होती. याचा फटका महायुतीला बसू शकतो, हे लक्षात येताच भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी रविवारी रामदास पाटील यांच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.


गिरीश महाजन यांची शिष्टाई सफल


यावेळी गिरीश महाजन यांच्यासह श्रीकांत भारतीय, भागवत कराड हे भाजप नेते उपस्थित होते. या तीनही भाजपच्या नेत्यांनी रामदास पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. रामदास पाटील यांनी भरलेली अपक्ष उमेदवारी मागे घ्यावी, अशी विनंती भाजपच्या या नेतेमंडळींनी केली.  रामदास पाटील यांच्या हिंगोली येथील देवाश्रय या निवासस्थानी तब्बल तीन तास बंद दाराआड चर्चा झाली. पाटील यांनी भरलेली अपक्ष उमेदवारी मागे घ्यावी, अशी विनंती महाजन यांनी केली. त्यानंतर सोमवारी रामदास पाटील सुमठानकर यांनी त्यांचा निर्णय कळवत माघार घेतल्याचं सांगितलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


रोहिणी खडसेंचा एक निर्णय आणि थेट भाजपलाच धोबीपछाड