Mahavitaran Recruitment : महावितरण भरती प्रक्रियेच्या परीक्षेत घोळ (Scam) झाल्याचा परीक्षार्थी आणि स्पर्धा परीक्षा समन्वय समिती संघटनेने आरोप केला आहे. पारदर्शकता न पाळता भरती प्रक्रिया राबावली जात असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. ना परीक्षेचे मार्क, ना वेटिंग लिस्ट लावली, ना ही मेरिट लिस्ट लावली. मात्र थेट निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर केल्याने महावितरण भरती प्रक्रियेमध्ये घोळ झाल्याचा परीक्षा दिलेल्या उमेदवारांचा आणि संघटनांचा आरोप आहे. तर या सगळ्या प्रकरणाच्या विरोधात आता कोर्टात जाण्याची तयारीही विद्यार्थ्यांकडून  करण्यात आली आहे.


परीक्षार्थी अन् विद्यार्थी संघटनेचा आरोप


मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणकडून 24 ऑक्टोबर 2024 रोजी अभियंता पदासाठी परीक्षा घेण्यात आली आणि निकाल 14 जानेवारीला जाहीर करण्यात आला. मात्र आयबीपीएसकडून घेण्यात आलेल्या या परीक्षेच्या निकालामध्ये ना उमेदवाराचे गुण दिले, ना मिरीट लिस्ट लावली, ना ही  वेटिंग लिस्ट लावली. मात्र यात थेट 297 विद्यार्थ्यांची निवड झाल्याचा निकाल 14 जानेवारी जाहीर करण्यात आला. मात्र हा निकाल सुद्धा काही वेळात वेबसाईटवरून काढून टाकून पुन्हा 15 जानेवारीला फेरफार करून निकाल जाहीर करण्यात आला. मात्र अशा प्रकारे निकाल जाहीर केल्यानंतर परीक्षा देणाऱ्या उमेदवारांपासून स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून सुद्धा या सगळ्या भरती परीक्षेवर आणि प्रक्रियेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.  


कोर्टात दाद मागण्याचीही तयारी


पारदर्शकपणे महावितरणाची ही  भरती प्रक्रिया राबवली जात नसल्याचा आरोप  उमेदवारांनी त्यासोबत स्पर्धा परीक्षा समन्वय समिती संघटनेने केला आहे. यामध्ये आणखी महत्त्वाचं म्हणजे GATE परीक्षा उत्तीर्णची अट यामध्ये देण्यात आली होती आणि त्या विरोधात कोर्टात प्रकरण असताना सुद्धा ही भरती प्रक्रिया राबवली गेल्याचे उमेदवारांचे म्हणणं आहे. त्यासोबतच आता तातडीने म्हणजेच आज पासून डॉक्युमेंट वेरिफिकेशन करून ज्या उमेदवारांची निवड करण्यात आली आहे त्यांना तातडीने रुजू करण्याच्या हालचाली केल्या जात असल्याचा सुद्धा इतर उमेदवारांचे म्हणणं आहे. त्यामुळे या सगळ्या विरोधात काही उमेदवार कोर्टात जाण्याच्या तयारीत असल्याचेही पुढे आले आहे.   


महावितरण परीक्षेचा निकाल जाहीर करताना विद्यार्थ्याला मिळालेले गुण जाहीर करावे, त्यासोबतच मिरीट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट सुद्धा जाहीर करावी. आणि ही लिस्ट जारी करत असताना GATEची पात्रता अट रद्द करून निकाल जाहीर करावा, अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात आली आहे.  


इतर महत्त्वाच्या बातम्या :



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI