मुंबई : शिक्षकांच्या बदल्यांमधील 'अर्थ'कारण आणि वशिलेबाजी रोखण्यासाठी भाजप सरकारने विशेषकरून पंकजा मुंडे यांनी ऑनलाईन बदल्यांचे धोरण अवलंबिले होते. मात्र आता महाविकास आघाडी सत्तेत येताच हे धोरण बदलून बदल्यांचे अधिकार पुन्हा जिल्हा परिषदेकडे सोपविण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यासाठी ग्रामविकास विभागाने अभ्यासगट नेमला आहे. शिक्षकांच्या ऑनलाईन बदलीचे नवे धोरण ठरविण्यासाठी पाच जणांची समिती स्थापन केली आहे. मंगळवारी ग्रामविकास विभागाने या संदर्भाचा अभ्यास गट नेमला. त्यात पुणे, रायगड, चंद्रपूर, नंदूरबार आणि उस्मानाबादचे सीईओ सदस्य आहेत. हा अभ्यासगट 11 फेबुवारीला सरकारला आपला अहवाल सादर करेल. 27 फेब्रुवारी 2017 रोजी जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानुसार बदलीचे सर्व अधिकार ग्रामविकास मंत्रालयाकडे एकवटले होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा बदल्या जिल्हापातळीवरती सुपूर्त करण्याला विरोध केला आहे. बदल्या ऑनलाईनच व्हायला हव्यात, बदल्यासंदर्भात कांही त्रुटी असतील तर त्यात दुरुस्ती होऊ शकते. पण शिक्षकांच्या सर्व बदल्या ऑनलाईन हव्यात अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे.


शिक्षकांच्या बदल्यांमधील 'अर्थ'कारण?
27 फेब्रुवारी 2017 रोजी जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानुसार बदलीचे सर्व अधिकार ग्रामविकास मंत्रालयाकडे एकवटले होते. आता राज्य शासनाने शिक्षकांच्या ऑनलाइन बदलीचे नवे धोरण ठरविण्यासाठी पाच जणांची समिती स्थापन केली आहे. मंगळवारी ग्रामविकास विभागाने या संदर्भाचा अभ्यास गट नेमला आहे.

शिक्षकांच्या बदल्या आता ऑनलाईन पद्धतीने होणार : पंकजा मुंडे

शिक्षक संघाचा बदल्या जिल्हापातळीवरती सुपूर्त करण्याला विरोध
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा बदल्या जिल्हापातळीवरती सुपूर्त करण्याला विरोध आहे. बदल्या ऑनलाइनच व्हायला हव्यात. बदल्यासंदर्भात काही त्रुटी असतील तर त्यात दुरुस्ती होऊ शकते. पण शिक्षकांच्या सर्व बदल्या ऑनलाईन हव्यात, असं शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी म्हटलं आहे. बाळकृष्ण तांबारे यांनी सरकारला निवेदन देखील दिलं आहे.

पंकजा मुंडे यांनी घेतला होता निर्णय

राज्यातील शिक्षकांच्या बदल्या यापुढे ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. यामुळे पारदर्शकता राहण्यास मदत होईल, असं म्हणत तत्कालीन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला होता. त्याआधी मॅन्युअली बदल्या होत होत्या. त्यामुळे ज्यांच्यावर वरदहस्त असेल, त्यांनाच याचा फायदा व्हायचा. काही शिक्षक 15-15 वर्षे दुर्गम भागात सेवा बजावत आहेत. ऑनलाईन शिक्षक बदली निर्णयाचा अशा शिक्षकांना फायदा होईल, असंही पंकजा मुंडे यांनी हा निर्णय घेताना सांगितलं होतं.