Kalyan: तरूणींची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी एका रेल्वे कर्मचाऱ्याला बेड्या ठोकल्याची माहिती समोर आलीय. कल्याणच्या कोलशेवाडी पोलीस ठाण्याच्या (Kolsewadi Police Station) हद्दीत हा प्रकार घडलाय. आरोपी हा एका तरूणीशी प्रेम संबंध ठेवून अन्य दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याच्या तयारीत होता. यानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजलीय.
अजय उर्फ विक्की फ्रान्सिस असं आरोपीचं नाव आहे. आरोपी हा कल्याण रेल्वे यार्डमध्ये कामाला आहे. त्याचे गेल्या काही महिन्यांपासून मॅरेज इव्हेंट मॅनेजर म्हणून कार्यरत असलेल्या एका तरूणीसोबत प्रेमसंबंध सुरू होते. दरम्यान, आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवत अनेकदा संबंधित तरूणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. एवढेच नव्हेतर, तरूणी गर्भवती राहिल्यानंतर आरोपीनं तिला गर्भपात करण्यास सांगितलं. याचदरम्यान, आरोपी 29 डिसेंबर रोजी अन्य दुसऱ्या मुलीशी लग्न करणार असल्याची माहिती या तरूणीला मिळाली. त्यानंतर तिनं कोलशेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरोधात तक्रार दिली.
त्यानंतर कोलशेवाडी पोलीसानी तत्काळ या प्रकरणाचा तपास सुरू केला. कोलशेवाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी तरुणीच्या तक्रारीनंतर कोलशेवाडी पोलिसांचं पथक अमरावती येथील बडनेरा येथे पोहचलं. तिथं आरोपीच्या लग्नाची तयारी सुरू होती. पहाटे पाच वाजताच्या सुमारास पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच याप्रकरणातील पुढीस तपास पोलीस निरीक्षक इर्शाद सय्यद करीत आहेत. तसेच आरोपीनं अन्य कोणत्या तरूणींची फसवणूक केली आहे का? याचाही तपास केला जात आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-
- संतापजनक! नराधम पित्याकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; बाप-लेकीच्या नात्याला काळीमा
- 13 वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या फादरला कठोर जन्मठेपेची शिक्षा
- इस्लामपूर पोलिसांकडून कोकेन तस्कर नायजेरियन तरूण जेरबंद
- टीईटी घोटाळ्यात नवा ट्वीस्ट, सुपेनंतर आणखी एका आरोपीकडून 24 किलो चांदी दोन किलो सोनं, काही हिरे जप्त