Mumbai Latest Updates : एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपात मुंबईतील एका ख्रिस्ती धर्मगुरूला दोषी ठरवण्यात आलं आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पॉक्सो कोर्टानं बुधवारी फादर जॉन्सन लॉरेन्स याला सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश सीमा जाधव यांनी आरोपीला पॉक्सो कायद्यातील कलम 6 आणि 12 अंतर्गत दोषी घोषित करत ही शिक्षा सुनावली आहे. डिससेंबर 2015 मध्ये मुंबई पोलिसांनी याप्रकरणी या 52 वर्षीय पाद्रीला अटक केली होती, तेव्हापासून तो तुरूंगातच आहे.
काय घडली होती घटना -
पीडित मुलगा हा ऑगस्ट 2015 मध्ये चर्चमध्ये नियमित प्रार्थनेसाठी जात होता. त्यादरम्यान आरोपी फादरनं त्याला अनेकदा सर्वजण गेल्यानंतर एकट्याला थांबवलं होतं. पीडित मुलगा हा गरीब कुटुंबातून होता, चर्चमधून मिळणाऱ्या मदतीवर परिणाम होईल या भितीनं त्यानं घडत असलेल्या अत्याचाराची कुणालाही लगेच माहिती दिली नाही. मात्र हळूहळू त्याच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होऊ लागला. तो एकटा एकटा आणि शांत राहू लागला, पुढे त्याची तब्येतही नाजूक राहू लागली आणि त्याला रूग्णालयात दाखल करावं लागलं.
नोव्हेंबर 27 रोजी मुलगा आपल्या कुटुंबासोबत पुन्हा चर्चमध्ये गेला. त्यावेळी आरोपी फादरनं त्याला एक बॉक्स आपल्या ऑफिसमध्ये जाऊन ठेवण्यास सांगितलं आणि पाठोपाठ तोही तिथं गेला. त्या रात्री पुन्हा त्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आले. घरी गेल्यावर मात्र त्या मुलानं आपल्या आईला घडलेली हकीकत सांगितली आणि त्यानंतर आईवडिलांनी याची पोलिसांत तक्रार दिली.
आरोपी फादर जॉन्सन लॉरेन्सनं आपल्यावरील सर्व आरोप कोर्टात फेटाळून लावले होते. मात्र सरकारी पक्षानं कोर्टात मुलाची तपासणी करणाऱ्या डॉक्टरसह नऊ अन्य साक्षीदार आणि अन्य पुरावे सादर करत फादरवरील आरोप सिद्ध केले.
इतर महत्वाच्या बातम्या
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha