उस्मानाबाद : उस्मानाबादमधील कळंब तालुक्यातील येरमाळा गावातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीवर भाजपनं विकास बारकुल यांच्या नेतृत्वात एकहाती विजय मिळवला आहे. माजी पंचायत समिती सभापती व सरपंच राहिलेले विकास बारकुल यांच्या पॅनलने सर्व 13 जागांवर पुन्हा एकदा हॅटट्रिक कपर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.


13 पैकी 13 जागेवर बारकुल यांच्या गटाचे उमेदवार निवडून आले आहेत. येरमाळा गावात प्रथमच मोठे प्रतिस्पर्धी असताना एका पॅनलमधून र्वच्या सर्व उमेदवारी निवडून येणे ही मोठी गोष्ट मानली जात आहे. प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या व राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. कळंब तालुक्यातील येरमाळा गावाची ग्रामपंचायत निवडणूक भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अशी तिहेरी लढत होती.


विकास बारकुल यांना 400 मते मिळाली असून, बारकुल यांच्यासाठी ही निवडणूक ही महत्वपूर्ण होती. कारण त्यांनी आतापर्यंत 4 वेळा पॅनल प्रमुख म्हणून एकहाती सत्ता स्थापन करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत आले होते. राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या आ.राणा जगजितसिंह पाटील यांचे समर्थक म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली.


विकास बारकुल यांच्यामुळे या भाजपच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. याआधी त्यांनी जिल्हा बँक, पंचायत समिती सभापती, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आदी पदे भूषविले आहेत. येरमाळा ग्रामपंचायतीकडे कळंब तालुक्यासह पंचक्रोशीतील गावांचे लक्ष लागले होते. येरमाळा ग्रामपंचायत सोबतच त्यांनी कळंब तालुक्यातील आपले वर्चस्व दाखवून दिले आहे.


गावपातळीवर पक्ष नव्हे तर पॅनल महत्वाचं
ग्रामपंचायतीच्या निवडणुका म्हटलं की गावगाड्यातला मोठा उत्साह असतो. मात्र या निवडणुकांमध्ये स्थानीय लेव्हलवरचं राजकारण हे अनेकदा विकोपाला गेलेलं पाहायला मिळतं. बहुतांश गावं दोन पॅनलमध्ये विभागलेली असतात. काही गावांमध्ये तर एकाच नेत्याच्या किंवा पक्षांचे दोन पॅनल असतात. सांगायचा उद्देश हा की, ग्रामपंचायत निवडणुका या पार्टीच्या चिन्हावर लढवल्या जात नाहीत तर पॅनल निहाय लढवल्या जातात. जे उमेदवार आज अमक्या नेत्याच्या गटाचे म्हणून सांगितले जातात ते विरुद्ध पार्टीचेही असू शकतात. त्यामुळं नेत्यांनी किंवा पक्षांनी आम्हाला इतक्या जागा मिळाल्या, असं सांगितलेलं अनेकदा खरं असेलच असं नाही.



संबंधित बातम्या
Gram Panchayat Election Results 2021 | हिवरे बाजारमध्ये पोपटराव पवारांचं वर्चस्व, सातही जागांवर विजय


Gram Panchayat Election Results | अकलूजमध्ये विजयसिंह मोहिते पाटीलच 'दादा', माळशिरसमध्येही 44 पैकी 35 ग्रामपंचायतींवर वर्चस्व


Maharashtra Gram Panchayat Election Results | चंद्रकांत पाटलांना गावही राखता आलं नाही, शिवसेनेचा सहा जागांवर विजय


औरंगाबादमधील पाटोद्यात भास्कर पेरे-पाटलांचं वर्चस्व संपुष्टात; 25 वर्षांनंतर गावात सत्तांतर


Gram Panchayat Election Result : विजयानंतर गुलाल उधळणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांचा चोप