पालघर : पालघर जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. सकाळी 10.30 वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या 1 तासात सर्व मतमोजणी सुरळीतपणे पूर्ण झाली. जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायत तीन पक्षांकडे गेल्या आहेत. पालघर तालुक्यातील सांगावे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. शिवसेनाप्रणित ग्रामविकास पॅनलने याठिकाणी 7 पैकी 4 जागांवर विजय मिळवला. तर 3 जागा स्थानिक युवा पॅनलने जिंकल्या आहेत.


तर वसई तालुक्यातील सत्पाला ग्रामपंचायतीमध्ये मनसेने इन्ट्री मारली आहे. मनसे पुरस्कृत ग्रामविकास पॅनलचे 11 पैकी 9 सदस्य विजयी झाले आहेत. तर 2 सदस्यांवर बहुजन विकास आघाडीला समाधान मानावे लागले आहे. ग्रामविकास पॅनलमध्ये मनसे, आदिवासी एकता परिषद आणि निर्भय जनमंच सहभागी होते.


तसेच वसई तालुक्यातील पाली ग्रामपंचायत आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व राहिले आहे. 7 सदस्य पैकी 6 सदस्य हे बहुजन विकास आघाडीकडे तर 1 सदस्य हा शिवसेनेचा निवडून आला आहे. पाली ग्रामपंचायतीमध्ये ओल्गा विलास दुरुगुडे ह्या केवळ 1 मताने निवडून आल्या आहेत. दूरगुडे यांना 51 तर त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या स्विटी स्टीफन बार यांना 50 मते पडली आहेत.


संबंधित बातम्या