Yavatmal Washim Lok Sabha: लोकसभा निवडणुकांचं (Lok Sabha Election 2024) बिगुल केव्हाच वाजलं असून लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील (Lok Sabha Election Second Phase) निवडणुकांची अधिसुचना देखील जारी झाली आहे. असं असलं तरी राज्यात सत्तेत असलेली महायुती (Mahayuti) आणि विरोधी बाकांवर बसलेल्या महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) जागावाटपाचा तिढा काही सुटायचं नाव घेत नाही. अशातच यवतमाळ वाशिम लोकसभा मदारसंघातील महायुतीचा उमेदवार काही केल्या ठरत नसल्याचे चित्र आहे. एकीकडे महाविकास आघाडी आणि वंचितने (VBA) आपले उमेदवार घोषित करून मतदारसंघात जोरदार प्रचारही सुरू केला आहे. मात्र महायुतीमध्ये नेमकी कुणाला उमेदवारी मिळते हे आद्यप स्पष्ट न झाल्याने महायुतीच्या पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी संभ्रमात पडले आहे.
महायुतीचा उमेदवार ठरता ठरेना
यवतमाळ-वाशिम (Yavatmal-Washim) लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाकडून (Shivsena Thackeray) संजय देशमुख (Sanjau Deshmukh) यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुभाष पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे याच मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून आलेल्या भावना गवळी (Bhavana Gawali) यांनी वेळोवेळी या मतदारसंघावर आपला दावा केला असून उमेदवारी आपल्यालाच मिळणार असल्याचा विश्वास नेहमी बोलून दाखवल आहे. असे असताना भावना गवळी यांच्या नावावर भाजप (BJP) अनुकूल नसल्याने नवीन उमेदवार शिंदे यांना शोधावा लागत आहे का, अशी शक्यता देखील या निमित्याने उपस्थित करण्यात येत आहे.
महायुतीमधील जागावाटपाचा तिढा कायम
या मतदारसंघात खासदार भावना गवळी या पाच टर्म निवडून आल्या असून गेल्या 25 वर्ष त्यांनी हा एकहाती गड राखला आहे. त्यामुळे या निवडणुकीतही आपल्याला उमेदवारी मिळेल, असा त्यांना आत्मविश्वास आहे. मात्र, आता निवडणुकीत महायुतीमध्ये उमेदवारी मिळविताना त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र आहे. दरम्यान या मतदारसंघासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून दोन नावांची उमेदवार म्हणून चाचपणी करण्यात आल्याचीही माहिती पुढे आली आहे. मात्र,अद्याप या उमेदवारीचा तिढा सुटला नसल्याने अनेक तर्क वितर्क आणि चर्चानां उधाण आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या