यवतमाळ : जलसंधारण मंत्री तथा यमतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. अपघातानंतर गाडीतील एअरबॅग्ज खुल्या झाल्यामुळे संजय राठोड सुदैवाने बचावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दिग्रस जवळील कोपरा येथे हा अपघात घडला आहे. राठोड यांच्या वाहनाने समोरच्या पिकअपला जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे. 


संजय राठोड सुखरुप, पिकअपचा ड्रायव्हर जखमी


 मिळालेल्या माहितीनुसार संजय राठोड 3 ऑक्टोबर रोजी यवतमाळच्या दौऱ्यावर होते. रात्री प्रवास करत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. त्यांच्या वाहनाने समोरच्या पिकअपला जोरदार धडक दिली. त्यामुळे गाडीच्या समोरच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर लगेच गाडीतील एअरबॅग्ज उघडल्या गेल्या. त्यामुळे सुदैवाने संजय राठोड बचावले आहेत. या अपघातात पिकअपचा ड्रायव्हर मात्र जखमी झाला आहे.


अपघात कसा झाला? 


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहरा देवीला भेट देणार आहेत. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड हे पोहरादेवी येथे होते. ते रात्री 2 ते अडीच वाजेदरम्यान ते पोहरादेवी येथून निघाले. ते पोहरादेवी येथून यवतमाळकडे जात होते. मात्र आर्णी येथील कोपरा गावाजवळ संजय राठोड यांच्या वाहनाने समोरच्या पिकअपला धडक दिली. या धडकेत पिकप वाहनाचा चालक सय्यद इस्माईल गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पिकअप चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार चालू आहेत.


पाहा व्हिडीओ : 



पिकअपचा चालक जखमी


हा अपघात चांगलाच भीषण होता.  या अपघातात पिकअप तसेच संजय राठोड यांच्या वाहनाची मोठी हानी झाली आहे. अपघातानंतर पिकअप वाहन पलटी झाले. ज्यामुळे पिअकपचा चालक जखमी झाला. रात्री दोन ते अडीच वाजता ही घटना घडली.


हेही वाचा :


BJP Candidate List : विदर्भात भाजपचं धक्कातंत्र? यवतमाळमधून संजय राठोड तर राष्ट्रवादीच्या धर्मबाबा अत्रामांना 'कमळा'च्या चिन्हावर उतरवण्याची तयारी


Yavatmal Washim : भावना गवळी वि. संजय राठोड, यवतमाळ-वाशिमच्या राजकारणात सुप्त स्पर्धा, टोकाचा संघर्ष, तरीही राजकीय परिपक्वता


Amit Shah: एकनाथ शिंदे मनासारख्या जागा पदरात पाडून घेणार? अमित शाहांसोबतच्या बैठकीत डिटेल प्लॅन सांगितला, नेमकं काय घडलं?