मुंबई: लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आजी खासदारांचा पत्ता कट करून नवीन चेहरे देण्याचं भाजपचं धक्कातंत्र राज्यातही सुरू आहे. आता विदर्भातही तीच चाल भाजप खेळण्याची शक्यता आहे. विदर्भात चार जागांवर नवीन चेहरे देण्याच्या तयारीत (BJP Vidarbha Candidate List) असून काही ठिकाणी मित्रपक्षांच्या उमेदवारांना कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार असल्याचं चित्र आहे. 


भाजपने महाराष्ट्रातील पहिल्या 20 उमेदवारांची यादी जाहीर करून पाच लोकसभा मतदारसंघात धक्कातंत्राचा वापर केला. भाजपचे हे धक्कातंत्र अजून संपले नसून विदर्भात आणखी 4 लोकसभा मतदारसंघात असेच धक्कातंत्र देण्याच्या तयारीत केंद्रीय नेतृत्व असल्याची माहिती आहे. त्यामध्ये संजय राठोड यांना महायुतीच्या माध्यमातून लोकसभेचा उमेदवार जाहीर केला जाणार असल्याची माहिती आहे. तसेच गडचिरोली चिमूर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे मंत्री धर्मरावबाबा अत्राम (Dharmababa Atram) यांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल असं चित्र आहे. 


कोणत्या ठिकाणी उमेदवार बदलण्याची शक्यता (BJP Vidarbha Candidate List) 


भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार सुनील मेंढे यांच्या जागी परिणय फुके यांना भाजप रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे. 


रामटेकमध्ये भाजप नवीन प्रयोग करत असून काँग्रेसमधून  एका आमदाराला आयात करून त्याला तिकीट देण्याची शक्यता आहे. 


यवतमाळ वाशीममध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून भावना गवळी यांच्या जागी संजय राठोड लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता


गडचिरोली लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून धर्माबाब आत्राम यांना भाजपच्या चिन्हावर उतरवण्याच्या तयारीत आहे. 


राज्यातून भाजपला 45 पेक्षा अधिक खासदार निवडून आणायचे आहेत. त्यासाठी पक्षाने सुक्ष्म स्तरावर अहवाल तयार केला असून त्या अहवालात ज्या खासदाराच्या विरोधात जनमत असल्याचं दिसतंय त्याचं तिकीट कापण्यात येतंय. त्या ठिकाणी निवडून येण्याची शक्यता असलेला उमेदवार देण्यात येतोय.


विदर्भातही हीच चाल भाजपकडून खेळण्यात येणार आहे. विदर्भात या आधी नितीन गडकरी आणि सुधीर मुनगंटीवार असे दोन उमेदवार जाहीर केले आहेत. आता इतर चार ठिकाणी नवीन चेहरे देण्यासाठी हालचाल सुरू आहे.


यवतमाळ वाशिममधून भावना गवळींचा पत्ता कट? 


यवतमाळ वाशिमच्या विद्यमान खासदार आणि शिवसेना शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांचे तिकीट कापण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्या ठिकाणी संजय राठोड यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. 


ही बातमी वाचा: