यवतमाळ : वेगवेगळ्या बंगल्यावर आणि निवासस्थानावर केलेला वारेमाप खर्च सध्या चर्चेचा विषय आहे.परंतु यवतमाळ चे एक शासकीय निवासस्थान हे सर्व गोष्टीला अपवाद ठरत आहे. या शासकीय निवासस्थानी संपूर्ण परिसर हिरवागार झाला असून येथे स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी शेतात राबून आपल्या 'शाल्मली' या निवासस्थानी हिरवागार मळा फुलवला आहे .


यवतमाळच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांचे निवासस्थान आहे .संपूर्ण सहा एकर परिसरामध्ये कानाकोपरा हा हिरवागार दिसून येतो. कुठे उंचच उंच ज्वारी चे पीक कुठे हिरवीगार तूर कुठे ,हरभरा, कुठे कोबी, टमाटर, मका,काकडी, दोडके ,कारली, वांगी, मेथी , कोथिंबीर अशाभाजीपला पीकांनी हा परिसर बहरला आहे. तर कुठे आंबा ,फणस , चिकू आवळा,फळांची झाडे येथे आणि औषधी वनस्पती येथे दृष्टीस पडतात. अशा विविध फळझाडे आणि भाजीपाला आपल्या संपूर्ण परिसरातील जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी फुलविला आहे.

वर्षभरापूर्वी यवतमाळ जिल्हाधिकारी म्हणून अजय गुल्हाने यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. ते उद्यान विज्ञान विषयात त्यांनी एमएससी असल्याने त्यांना शेतीची आवड होतीच येथे आल्यानंतर हा संपूर्ण परिसर ओसाड पडला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी पद स्वीकारल्यानंतर त्यांनी संपूर्ण क्षेत्राचा पडीक जमिनीचा कायापालट केला आहे आणि नियोजन करत या संपूर्ण परिसराला हिरवागार केले आहे.

येथे वेगवेगळ्या जातीचे 10 -10 फळझाड लावली आहेत. यात संत्रा, मोसंबी,आवळा,आंबा फणस याची लागवड केली आहे. विशेष म्हणजे या परिसर जिल्हाधिकारी यांना ग्रीन फेज म्हणून विकसित करायचा आहे. त्यासाठी त्यांना मियावाकी या लागवड करायची आहे. या मियावाकीमुळे इकोसिस्टीम तयार होत असून या मियावाकीमुळे तिथे छोटे प्राणी ,कीटक पक्षी आश्रयाला येतात आणि एक प्रकारच ग्रीन पेज तयार करायचा आहे.

विशेष म्हणजे या ठिकाणी एकत्र झालेला कचऱ्याचे येथे योग्य नियोजन केले जाते. तिथे कंपोस्ट गांडूळ खत तयार केले जाते आणि येथे कुठल्या प्रकारचे कीटकनाशकाची फवारणी न करता संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने इथे भाजीपाला आणि इतर पिकांचे उत्पादन घेतले जाते. जिल्हाधिकारी हे पद आणि पदावरील व्यक्तीला त्याच्यावर असलेल्या अनेक जबाबदारीमुळे कामाचा तणाव राहतो. तणाव दूर करण्यासाठी येथे शेतामध्ये ते प्रत्यक्ष राहून सकाळी आणि ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी येथे येऊन ते आपल्या ताणतणाव स्ट्रेस कमी करण्यास त्यांचा कमी होतो. येथे काम केल्याने त्यांना समाधान मिळते असे त्यांनी सांगितले आहे.

विशेष म्हणजे जुन्या अधिकाऱ्यांनी या भागांमध्ये अनेक औषधी वनस्पतींची लागवड केली आहे. या परिसरात निघालेले उत्पन्न ते वृद्धाश्रम यांना देण्याचा त्यांचा मनोदय आहे ओसाड पडलेल्या जागेवर हिरवेगार माळरान फुलविल्याने परिसर रम्य दिसत आहे.