नवी दिल्ली : खरंतर मजकूर आणि ई-मेलच्या या डिजिटल युगात बसून कागदावर पत्र लिहिणं जवळजवळ दुरापास्तचं झालंय.. पण पत्र लिहिण्याची कला जोपासली तिचं संवर्धन केलं तर स्वाभाविक त्यातून मिळणारा आनंद हा अवर्णनिय असतो. मनातल्या कोपऱ्यात एक हळवी बाजू असते ज्यात प्रिय व्यक्तींना स्थान असतं, त्या व्यक्तींसाठी म्हणून लिहिलेला संदेश, जोडलेला दुवा हा कधीकाळी पत्र असे.


पण पत्र का लिहितात माहिती आहे?
असं म्हणतात....



  • आपल्या आवडत्या लोकांशी संवाद साधण्याचा हा एक विचारशील मार्ग आहे.

  • जी लोकं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पत्रं लिहितात त्यांना जीवनाबद्दल अधिक आनंद आणि समाधानी वाटत.

  • मैत्री, विवाह किंवा इतर अर्थपूर्ण नातेसंबंध मजबूत करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.

  • पत्रलेखन हे एखाद्या विशिष्ट विषयावरचा आपला दृष्टीकोन किंवा स्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करू शकतो

  • आपले जुने मित्र आणि नातेवाईकसोबत संवादाचं पारंपारिक स्वरूप जपलं जातं.

  • जर सुंदर हस्ताक्षर असेल तर ते तुमचं लेखन कौशल्य दाखवण्याचा हा एक मार्ग आहे.


याशिवाय मजकूर किंवा ई-मेलऐवजी पत्र लिहिण्याचं आणखी एक कारण म्हणजे आपण काय लिहित आहोत याबद्दल खरोखर विचार करायला भाग पाडतं. यासोबतच हस्तलिखित पत्र निवडक अक्षरांसह आपल्याला काय लिहितो आहोत याची अधिक काळजी घेण्यास भाग पाडतं.


जागतिक पत्र लिखाणाचा इतिहास सांगतो की, 


रिचर्ड सिम्पकिनने 2014 मध्ये जागतिक पत्र लेखन दिनाची स्थापना केली. 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात, सिम्पकिनने ऑस्ट्रेलियन लीजेंड्सना पत्र लिहिलं होतं आणि जेव्हा त्यांनीसुद्धा त्याला पत्राद्वारे प्रतिसाद दिला तेव्हा तो उत्साहित झाला, त्याचाही आनंद गगनात मावेनासा झाला.यानंतर 2005 मध्ये सिम्पकिनने त्यांचे पुस्तक "ऑस्ट्रेलियन लीजेंड्स" प्रकाशित केले. यावेळी त्याच्या मनात कल्पना आली, पत्र लेखन दिन का असू नये? यातून मग पुढे पत्र लिहिण्यासाठी समर्पित आजच्या दिवसाची निवड झाली. पत्र लेखनाला प्रोत्साहन देण्यासाठी सिम्पकिन याने ऑस्ट्रेलियात शाळांमध्ये पत्र लेखन कार्यशाळाहा घेतल्या आणि प्रौढांना सोशल मीडियापासून जराशी विश्रांती घेऊन पत्र लिहिण्यास प्रोत्साहित केलं


काही प्रसिद्ध व्यक्तींची पत्र वाचायची आहेत?


शिवाय हस्तलिखित पत्र लिहिण्याची योग्य पद्धत जाणून घ्यायची असेल तर मार्टिन ल्यूथर किंग, जूनियरचे "बर्मिंघम जेलमधून पत्र" या सारख्या इतिहासाचा मार्ग बदलणारी संशोधन पत्रे खूप दिशादर्शक आहेत.


शिवाय लोकमान्य टिळकांची पत्रेही वाचा.


लेटर्स ऑफ द सेंचुरी वाचा: अमेरिका 1900-1999 संपादक लिसा ग्रुनवाल्ड, स्टीफन जे. अॅडलर, प्रिय ड्रॅगन: एक पेन पाल कथा अशा काही पुस्तकांचा संग्रह जर तुम्ही ठेवलात तर नक्कीच या पुस्तकातील पत्रं तुम्हाला लिखाणाला, विचार करायला, पत्र लिहायला प्रवृत्त करतील यात शंका नाही.


तुम्ही आजचा दिवस सोशल मीडियावर #WorldLetterWritingDay किंवा #WLWD सह शेअर करू शकता. शिवाय हा दिवस साजरा करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे एखाद्याला पत्र लिहा. अशा व्यक्तीला जी व्यक्ती तुमच्यासाठी सर्वोत्तम असू शकते.