कायद्याने सगळ्यांना गर्भगृहात प्रवेश देण्याचे आदेश कोर्टाने दिल्यानंतर स्वराज्य संस्थेच्या महिलांनी त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाची इच्छा व्यक्त केली. मात्र मंदिर पुजारी आणि मानकऱ्यांसह गावकऱ्यांनीही विरोध केला.
गर्भगृह प्रवेश टाळण्यासाठी कडक अटी, शर्ती लागू करण्यात आल्या. त्यानुसार आज सकाळी 6 ते 7 ही दर्शनासाठीची वेळ म्हणून निश्चित करण्यात आली. मात्र महिला गर्भगृहासमोर दर्शनासाठी येताच वेळ संपल्याचं सांगत बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला.
या अटींना विरोध केल्यानंतर गर्भगृहासमोर असलेल्या तथाकथित संस्कृतीरक्षकांनीच महिलांना अमानुष मारहाण केली. या प्रकरणी 150 गावकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाहा व्हिडीओ