बाळाचा मृतदेह हातात घेऊन भीक मागणाऱ्या महिलेला अटक
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 20 Apr 2016 07:16 AM (IST)
औरंगाबाद : बाळाचा मृतदेह हातात घेऊन भीक मागणाऱ्या एका महिलेला औरंगाबाद पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत ही महिला कुटुंबासहत राजस्थानमधून औरंगाबादेत आल्याचं समोर आलं आहे. शहरातील दिल्ली गेट परिसरात या चार महिन्यांच्या बाळाचा मतदेह कपड्यात गुडांळून ही महिला भीक मागत होती. मात्र पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना संशय आल्याने त्यांनी महिलेला ताब्यात घेतलं. अधिक चौकशी केली असता बाळ मृत असल्याचं समोर आलं. या बाळाचा मृत्यू कधी झाला?, भीक मागताना बाळ जिवंत होतं की मृत याची चौकशी सुरु आहे.