चंद्रपूर : दुहेरी हत्याकांडामुळे चंद्रपूर शहरात खळबळ माजली आहे. शहरातील बालाजी वॉर्ड परिसरात आजी आणि नातीची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. हत्येचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.
सुशीला पिंपळकर (वय वर्षे 52) असे आजीचे नाव, तर श्वेता राजपूत (वय वर्षे 7) असे नातीचे नाव आहे. श्वेता ही सुशीला यांच्या मुलीची मुलगी होती.
सुशीला पिंपळकर आणि त्यांची सात वर्षीय नात श्वेता राजपूत आज सकाळी फरशीवर पडल्याचे निदर्शनात आले. या दोघींची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सुशीला पिंपळकर या विधवा होत्या. त्यांना तीन मुली आहेत. मयत श्वेता राजपूत ही मुलीची मुलगी होती. घरात काही ठिकाणी आरोपींनी जाळपोळ करुन पुरावा नष्ट करण्याचा देखील प्रयत्न केला आहे. या दुहेरी हत्या प्रकरणात ओळखीची व्यक्ती सामील असल्याची दाट शक्यता असल्यामुळे पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.
चंद्रपुरात दुहेरी हत्याकांड, आजीसह नातीची गळा आवळून हत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Oct 2018 12:59 PM (IST)
सुशीला पिंपळकर आणि त्यांची सात वर्षीय नात श्वेता राजपूत आज सकाळी फरशीवर पडल्याचे निदर्शनात आले. या दोघींची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

प्रातिनिधीक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -