कोल्हापूर : देवकार्य करण्याच्या बहाण्याने सोने लुटण्यासाठी आरोपीने महिलेची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शांताबाई शामराव आगळे वय 80 अस मृत महिलेचं नाव आहे. मात्र पोलिसांनी देखील मोठ्या शिताफीने या हत्या प्रकरणाचा अवघ्या तीन तासात छडा लावला. संतोष परीट या आरोपीला महिलेच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे.


देवकार्य करण्याचा बहाणा करत सोने लुटण्यासाठी कोल्हापुरात 80 वर्षाच्या महिलेचा जाळून मृतदेह कापून निर्घुण खून केल्याची घटना काल समोर आली. सकाळी कोल्हापूरच्या राजराम तलाव परिसरात महिलेचा अर्धवट मृतदेह आढळून आला होता. या हत्या प्रकरणाचा तपास आव्हानात्मक होता. मात्र कोल्हापूर पोलिसांनी शिताफीने तपास करत छिन्न विच्छिन्न मृतदेहाची ओळख पटवली. शांताबाई आगळे यांचा तो मृतदेह होता.


दरम्यान कोल्हापूर पोलिसांच्या राजारामपुरी पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस आणि उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे पथक अशा सर्वांनी संयुक्त तपास करत अवघ्या तीन तासांमध्ये संतोष परीट याला अटक केली. शांताबाई श्यामराव आगळे यांना संतोषने 5 फेब्रुवारी रोजी देवकार्य करण्याच्या बहाण्याने घरातून बोलून त्यांचं सोनं लुटलं आणि खून केला. दरम्यान संतोष हा कर्जबाजारी झाला होता. त्या पैशांची गरज असल्याचं त्याने ही हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.


Urban Naxals | मोदींच्या हत्येचा कट रचल्याचं पत्र रोना विल्सनच्या लॅपटॉपमध्ये प्लान्ट केल्याचा दावा